घटस्थापना : उपवास केवळ चहावर करू नका, वाचा यासंबंधित १० आवश्यक गोष्टी

घटस्थापना : उपवास केवळ चहावर करू नका, वाचा यासंबंधित १० आवश्यक गोष्टी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – येत्या २९ सप्टेंबरला घटस्थापना होत आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस अनेक लोक उपवास करतात. यादिवसात काही लोक जास्तीत जास्त चहा पिऊन अतिशय कमी फराळ करतात. उपवासात अशा चुका केल्याने त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. उपवासात कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे याविषयी माहिती घेवूयात.

हे लक्षात ठेवा

१) दिवसभरात नारळपाणी आवश्य घ्या. यामुळे शरीराला आवश्यक न्यूट्रिएंट्स आणि इलेक्टरोलाइट्स मिळतील.

२) जास्त पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेट राहते. व आतूनही स्वच्छ राहील.

३) शेंगदाणे, बदाम, अक्रोड, नट्स खा. यामुळे पोट जास्तवेळ भरलेले राहील. ऊर्जाही मिळेल.

४) उपवासात शिंगाडा, किंवा भगरीच्या पिठाची पोळी तयार करून खा.

५) जास्त वेळ रिकाम्या पोटी राहू नका. यामुळे अ‍ॅसिडिटी वाढू शकते.

६) लिक्विड डाएटच्या नावाखाली फक्त चहा घेऊन व्रत करू नका. सॉलिड फूडही खाणे गरजेचे आहे.

७) ऊर्जा टिकवण्यासाठी प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट आहार घ्या. फॅटी पदार्थ कमी खा.

८) फ्रुट, दूध, ज्यूस यासारखे पदार्थ घ्या. यामुळे आवश्यक कॅलरी मिळतात.

९) आंबट फळ खाऊ नका. त्याऐवजी सफरचंद खावे.

१०) एकदाच न खाता, थोड्या-थोड्या अंतराने फ्रुट सलाड किंवा दही यासारखे पदार्थ खा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु