तणावामुळे तरूणांनाही जडत आहेत ; हृदयरोग, रक्तदाबासारखे आजार

तणावामुळे तरूणांनाही जडत आहेत ; हृदयरोग, रक्तदाबासारखे आजार

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीचा सर्वात जास्त दुष्परिणाम सध्या तरूणपिढीवर झाल्याचे दिसून येत आहे. उतारवयात होणारे अनेक आजार सध्या तरूणांना जडत आहेत. ही एक गंभीर जागतिक समस्या होऊ लागली आहे. कामाची धावपळ, कामाचा तणाव, आहाराकडे दुर्लक्ष, फास्टफूडचे सेवन, व्यसन, वाढलेली स्पर्धा यामुळे तरूण-तरूणी मानसिक तणावाखाली वावरत आहेत. याच तणावामुळे त्यांना अनेक आजार होत आहेत.

तणावामुळे स्नायूवर नकारात्मक परिणाम होऊन स्नायू दुखणे, आकडणे, ताण येणे असे त्रास सुरू होतात. यामुळे शरीराची ऊर्जापातळी खालावते. परिणामी अंग दुखणे आणि थकवा येण्याचा त्रास जाणवू शकतो. दिवसभर आळस आणि निरुत्साह जाणवत राहतो. पन्नास टक्के तणावाचा सामना करणारे लोक भविष्यात भावनिकदृष्ट्या कमकुवत समजतात. नव्वद टक्के डॉक्टरांना अमेरिकेतील कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये तणाव कमी करण्यासाठी पाचारण केले जाते. त्रेपन्न टक्के भारतीय तरुण तणावाचा सामना करत असतात.

तणाव असल्याचा संदेश मेंदू हायपोथॅलेमस नावाच्या भागाला देतो. यामुळे मूत्रपिंडाजवळ असणारे अड्रेनल कॉर्टेक्समधून स्ट्रेस हार्मोन्स सक्रिय होतात. परिणामी यकृत ग्लुकोजचे सामान्यापेक्षा जास्त निर्मिती करू लागतो. शरीर गरजे एवढे ग्लुकोज वापरतो आणि उर्वरित ग्लुकोज यकृतात जमा होतो. यामुळे यकृतावर दबाव वाढत राहतो.

कोणत्याही वेळी अचानक तणावाच्या स्थितीत गेल्याने पचन प्रणाली अनियंत्रित होते. अशाने भूक लागण्याचे प्रमाण कमी होत जाते. पोटात जळजळणे, वजन कमी होण्यासारख्या समस्या जाणवू लागतात. दीर्घकाळापर्यंत तणावात राहिल्यास पचनतंत्रावर विपरीत परिणाम होतो. आतडे आहारातील पौष्टिकतत्त्वाचे योग्य शोषण करू शकत नाहीत.

तणाव हा आरोग्यावर वाईट परिणाम करत असतो. तणावाच्या स्थितीत शरीरात अनेक बदल होत असतात. या बदलाना भरून काढण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च होते. अशा स्थितीत नव्र्हस सिस्टिम अँड्रोनल ग्लँड्सला अँड्रोनालिन आणि कार्टिसोल हार्मोन्स सक्रिय करण्याचा संदेश देतो. हे हार्मोन्स पीडित व्यक्तीच्या हृदयाची गती वाढवणे, रक्तदाब वाढवणे आणि पचन प्रणालीत बदल होण्यासाठी जबाबदार असतात.

तणावाला वेळीच ओळखणे आणि त्याचा सामना करणे अत्यंत गरजेचे आहे. असे न केल्यास हा तुमच्या आरोग्य आणि आयुष्यावर विपरीत परिणाम टाकतो. तणावाच्या साधारण लक्षणांनादेखील गांभीर्याने घेणे एक उत्तम पर्याय ठरतो. जास्त तणाव झाल्यावर हृदयाच्या स्नायू पेशी आकुंचित होऊ लागतात. यामुळे हृदयगती वाढते. ज्या रक्तवाहिन्या हृदयाच्या मांसपेशीपर्यंत रक्त पोहोचवण्याचे काम करतात. त्या तणावात जास्त रक्त पोहोचवू लागतात. अचानक रक्ताचे प्रमाण वाढल्याने श्वास घेताना त्रास होऊ लागतो. हृदयाला अतिरिक्त रक्त पुरवठा झाल्याने हृदयाच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु