‘Sponk’ आहे गुडघ्याचा दुर्मिळ आजार, वेळीच निदान होणे गरजेचे

‘Sponk’ आहे गुडघ्याचा दुर्मिळ आजार, वेळीच निदान होणे गरजेचे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : Spontaneous Osteonecrosis of the Knee ही असामान्य अशी समस्या असून यामध्ये बोन टिश्यू मृत होतात. गुडघ्याच्या सांध्यातील एका हाडावर याचा परिणाम होतो. रक्तपुरवठ्यात अडथळा किंवा कमजोर हाड फ्रॅक्चर झाल्याने बोन डेथ होते, असे म्हटले जाते. यावर वेळीच उपचार न झाल्यास समस्या आणखी गंभीर होते. ५५ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना ही समस्या जाणवते.

महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. तीव्र गुडघेदुखी, गुडघ्यांमध्ये सूज, चालताना त्रास होणे, गुडघ्याची हालचाल न होणे, गुडघा वाकवता न येणे, ही या आजाराची लक्षणे आहेत. २०१८ साली जर्नल इंटरनॅशनल ऑर्थोपेडिक्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, sponkचे एकतर निदान होत नाही किंवा अगदी शेवटच्या टप्प्यात निदान होते. या समस्येचे प्रमाण ०.३ टक्के आहे. sponkच्या सुरुवातीच्या टप्प्यात एक्स-रे सामान्य असतात. त्यामुळे याच्या निदानासाठी एमआरआय करण्याची गरज असते. एका ६१ वर्षांच्या महिलेला  sponk (Spontaneous Osteonecrosis of the Knee ही दुर्मिळ समस्या होती. त्यांच्यावर गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. अँजेला डिसूझा असे नाव असलेली ही महिला रस्ता ओलांडताना त्यांच्या उजव्या गुडघ्यात तीव्र वेदना झाली. त्यांना गुडघा हलवणेही अशक्य झाले होते.

वर्षभरापासून त्यांच्या गुडघ्यात तीव्र वेदना होत असल्याने त्या डॉक्टरकडे गेल्या. डॉक्टरांनी अँजेला त्यांना गुडघे प्रत्यारोपणाचा (नी रिप्लेसमेंट) सल्ला दिला. परंतु, शस्त्रक्रिया करण्यास भीती वाढत असल्याने त्यांनी प्रत्यारोपणाला नकार दिला. वेदना कमी करण्यासाठी घरी फिजिओथेरेपी सुरू केली. फिजिओथेरेपीच्या २० सत्रांनंतरही त्यांच्या गुडघ्यात वेदना सुरूच होत्या. शिवाय गुडघ्याची हालचालही करता येत नव्हती. यामुळे त्या माहिम, मुंबई येथील फोर्टिस रुग्णालयात आल्या असता काही चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी त्यांना sponkअसल्याचे निदान झाले.या समस्येबाबत संशय आल्यास आणि वेळेत MRI झाल्यास त्याचे निदान आणि योग्य ते उपचार मिळण्यात मदत होते. यामुळे ही समस्या शेवटच्या टप्प्यात पोहोचण्यापासून प्रतिबंध करता येतो आणि त्यामुळे गुडघा प्रत्यारोपणासारखी शस्त्रक्रिया टाळता येते. अँजेला यांच्यावर गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आणि आता त्यांच्यात सुधारणा झाली आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु