…म्हणून अशी ‘घ्या’ आपल्या नखांची काळजी

…म्हणून अशी ‘घ्या’ आपल्या नखांची काळजी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मुलींचे सौंदर्य हे त्यांच्या नखांमध्ये दडलेलं असत. मुलींचे नख सुंदर असतील तर सगळ्यांची नजर त्यांच्या नखांवर जाते. सतत तुटणारी, रुक्ष झालेली नखे सगळ्यांनाच त्रासाची वाटतात. नखांना पुरेसे पोषण, आर्द्रता आणि काळजी मिळत नसली तर नखे रुक्ष होऊन तुटतात. अश्या प्रकारच्या नखांची वाढ व्यवस्थित होत नाही आणि ती पिवळी दिसायला लागतात. त्यामुळे अगदी महागातले महाग नेल पॉलिश लावले किंवा मॅनिक्युअर करवून घेतले तरी तुटणारी नखे सुंदर दिसू शकत नाहीत. आपली नखे सुंदर दिसण्यासाठी खालील उपाय फायदेशीर ठरतात.

१) नखांना नियमितपणे बदामाचे तेल लावल्यास नखांचा रुक्षपणा दूर होऊन नखांना आर्द्रता मिळण्यास मदत होते. बदामाच्या तेलाने रोज मसाज केल्यास नखे चमकदार, सुदृढ दिसू लागतात. तसेच विटॅमिन ‘इ’ युक्त तेलाने नखांना मसाज केल्यासही नखांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळेल.

२) ऍपल सायडर विनेगर नखांच्या आरोग्याकरिता अतिशय गुणकारी आहे. त्यामध्ये असलेले मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, आणि लोह नखांच्या आरोग्याकरिता उत्तम पोषण देतात. त्याचबरोबर यामध्ये असलेले ऍसिड नखांवर येणाऱ्या बुरशीचा नायनाट करण्यास मदत करते.

३) सतत नेल पॉलिश आणि रिमूव्हर वापरल्यामुळे देखील नखे पिवळी दिसू लागतात. त्यामुळे नेल पॉलिशचा अतिरेकी वापर टाळायला हवा. सतत पाण्यामध्ये काम केल्याने नखांची आर्द्रता कमी होते. त्यामुळे रोज रात्री झोपण्याआधी नखांना एखाद्या चांगल्या मॉइश्चरायझर ने मसाज करावे. त्यामुळे नखे निरोगी आणि चमकदार राहतील.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु