निरोगी आयुष्यासाठी झोप आवश्यक, ‘हे’ आहेत ३ फायदे आणि ११ धोके

निरोगी आयुष्यासाठी झोप आवश्यक, ‘हे’ आहेत ३ फायदे आणि ११ धोके

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्यासाठी शांत आणि भरपूर झोप गरजेची असते. कमी झोपेमुळे हृदय, मेंदू आणि वजनावर अनेक प्रकारचे विपरीत परिणाम होतात. पुरेशी झोप घेण्याचे काही फायदे असून ते आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत फायदे

* चांगली झोप घेत असाल तर आयुष्य निरोगी राहील. झोपेचा संबंध आयुष्याशी आहे. सुदृढ आरोग्यासाठी शांत आणि पुरेशा झोपेची आवश्यकता असल्याचे सिद्ध झाले आहे.

* नेहमी गाढ आणि पुरेशी झोप मिळाल्यास स्मरणशक्ती वाढते. पुरेशी झोप झाल्यानंतर स्मृती चांगल्याप्रकारे काम करते. झोपेमुळे मेंदू जास्तीत जास्त माहिती ग्रहण करतो.

* ठरलेल्या वेळी झोपल्याने लठ्ठपणा वाढतो. एक रात्र झोपल्यामुळे एका निरोगी आणि सामान्य माणसाची ऊर्जा १५ ते २० टक्क्यांनी कमी होती. पाच तास किंवा त्यापेक्षा कमी झोपल्यास लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते.

कमी झोपेचे धोके

जास्त भूक लागण्याने अतिजेवणाचा धोका
व्यक्तीचा लूक आणि त्वचा खराब होते.
कामाच्या ठिकाणी कामगिरी खालावते.
कमी झोपेचा ब्रेन टिश्यूवर परिणाम होतो.
हदयरोगाचा धोका वाढतो.
अनेक प्रकारचा कर्करोग होऊ शकतो.
मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
पुरेशी झोप झाल्यामुळे स्मृतिभ्रंश होऊ शकतो.
डोकेदुखीचा शक्यता खूप वाढते.
१० सर्दीचा धोका तीन पटींनी वाढतो.
११ अपघाताचा धोका तीन पटींनी वाढतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु