सायलंट किलर आहे ‘हा’ आजार, तुम्‍ही असे ओळखू शकता याचे संकेत

सायलंट किलर आहे ‘हा’ आजार, तुम्‍ही असे ओळखू शकता याचे संकेत
आरोग्यनामा ऑनलाइन – टाइप-२ डायबिटीज हा आजार सायलंट किलर म्हणून ओळखला जातो. या डायबिटीजमुळे पुढे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच यास सायलंट किलर म्‍हटले जाते. या डायबिटीजमुळे युरिन इन्फेक्‍शनचाही त्रास सहन करावा लागतो. या आजाराचे संकेत वेळीच ओळखले तर त्यावर सहज नियंत्रण मिळवता येते. या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात हार्ट, किडनी, ब्रेन, डोळे तसेच संपुर्ण आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
हे आहेत संकेत

वारंवार लघवी
शरीरात जास्त प्रमाणात एकत्र झालेली शुगर लघवीच्याद्वारे बाहेर पडते. यामुळे वारंवार लघवीला जाण्याची समस्या होते.

खुप भूक लागणे
वारंवार भूक लागत असेल, जेवणानंतर लगेच भूक लागत असेल, तर तुम्हाला डायबिटीज असू शकतो.

तहान
डायबिटीज पेशंटच्या शरीरातील पाणी युरिनच्या माध्यमातून बाहेर पडते. यामुळे वारंवार तहान लागते.

कमजोर डोळे
डायबिटीजचा डोळ्यांच्या रेटिनावर परिणाम होतो. यामुळे डोळे कमकुवत होतात. धुसर दिसू लागते.

मुंग्या येणे, जळजळ
हात पाय सुन्न पडतात, मुंग्या येतात. तीव्र जळजळ होते, असे होत असेल तर डॉक्टरांकडे जावे.

जखम न भरणे
रक्तात साखरेचे प्रमाण जास्त असल्यास जखम लवकर भरत नाही.

त्वचेचे आरोग्य बिघडणे
डायबिटीजमध्ये त्वचेचे आरोग्य बिघडते. मान, गुडघे, कोपर यावर पांढरे डार्क डाग दिसू लागतात.

फोड, पुरळ
डायबिटीजमुळे चेहरा खराब होऊ शकतो. फोड, पुरळ येते. याकडे दुर्लक्ष करू नका.

आजारपण
डायबिटीजमुळे कोणता तरी आजार सतत होत असतो.

ऐकायला कमी येणे
डायबिटीजमुळे ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो..

थकवा
नेहमी थकवा जाणवतो. झोपेतून उठल्यावरही झोप पूर्ण झाली नाही, असे वाटणे, याचा अर्थ रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले आहे.

वजन अचानक कमी होणे
अचानक वजन कमी होणे, हा डायबिटीजचा संकेत असू शकतो. याकडे कधीही  दुर्लक्ष करू नका.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु