स्त्रियांनी रक्तदान करावे का ? जाणून घ्या रक्तदानाबाबत शास्त्रशुद्ध माहिती

स्त्रियांनी रक्तदान करावे का ? जाणून घ्या रक्तदानाबाबत शास्त्रशुद्ध माहिती

आरोग्यानामा ऑनलाइन टीम : आजही आपल्याकडे रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे रक्तदान करणारांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत खुपच कमी दिसून येते. त्यातुनही महिला रक्तदात्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. स्त्रियांनी रक्तदान करू नये, असाही गैरसमज काहीजण पसरवत असतात. परंतु, तज्ज्ञ यासंदर्भात काय सांगतात, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

हे आहे सत्य
या स्त्रियांनी बिनधास्त करावे रक्तदान
ज्या स्त्रियांच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्या बिनधास्त रक्तदान करू शकतात. मात्र, गर्भवती महिला, बाळाला अंगावर पाजणारी माता, मासिक पाळी सुरू असलेली महिला, यांनी त्या कालावधीत रक्तदान करू नये. इतरवेळी रक्तदान केले तरी चालते.

रक्तपेशी निरोगी रहातात
रक्तदानामुळे आरोग्य सुधारते, रक्तातील चिकटपणा कमी होतो, रक्तपेशी निरोगी होतात. तीन महिन्यांतून एकदा रक्तदान केल्याने शरीराची कोणतीही हानी होत नाही, असे नवे संशोधन सांगते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु