धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

आरोग्यनामा : ऑनलाईन टीम – दिवसेंदिवस रस्त्य़ावर वाढणारी गाड्यांची संख्या आणि औद्योगिकरण यामुळे वायू
प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. एका अहवालानुसार वायू प्रदूषणामुळे भारतीयांच्यावयोमानात २.६ वर्षांनी घट झाल्याचं समोर आलं आहे.

इतर देशांच्या तुलनेत आशिया खंडात वायू प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आलय. हवेच्या प्रदूषणामुळे
श्वसनासंबंधीत त्रास तर वाढतात तसेच इतर गंभीर आजार यामुळे मृत्यूमुखीपडणाऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.

जगातील वाढत्या प्रदूषणाचा धोका सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हरन्मेंट (CSE ) संस्थेनं तयार केलेल्या अहवालात अधोरेखित करण्यात आला आहे. घरातील आणि घराबाहेरील प्रदूषणामुळे गंभीर आजारांचा धोका वाढला आहे. ‘भारतीय नागरिकांच्या
मृत्यूला जबाबदार असलेल्या कारणांचा विचार केल्यास त्यात वायू प्रदूषण तिसऱ्याक्रमांकावर आहे.

वाढतं शहरीकरण, ओझोनचं नुकसान आणि घरगुती प्रदूषण यांमुळे मानवी जीवाला असलेला धोका वाढत आहे,’ अशी माहिती अहवालात आहे. दक्षिण आशियातील देशातील माणसांचं आयुष्य २.६ वर्षांनी कमी झालं आहे. जागतिकस्तरावरील आकडेवारीचा विचार केल्यास या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु