‘हात थरथरणे’ सामान्य समस्या नाही कारण…

‘हात थरथरणे’ सामान्य समस्या नाही कारण…

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – साधारणपणे उतार वयात हात थरथरू लागतात. मात्र तरुण वयात ही समस्या निर्माण होत असेल तर चिंतेचं बाब आहे. कदाचित हा एखाद्या आजाराचा संकेत असू शकतो. त्यामुळे हात नेहमीच थरथरत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या हात थरथरणे कोणत्या आजाराचे संकेत असू शकतात.

अ‍ॅनिमिया – शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमियाची समस्या होते.अ‍ॅनिमियाच्या रुग्णांमध्ये कमजोरी येते, ज्या कारणाने त्यांचे हात थरथरतात.

ब्लड प्रेशर – ब्लड प्रेशर कमी झाल्याने शरीरात ब्लड शुगर कमी होत असल्याने स्ट्रेस वाढू लागतो, त्यामुळे हात थरथरू लागतात.

शुगर – जर हात नेहमीच थरथरत असतील तर शुगर लेवल अवश्य चेक करून घ्या.

बी १२ ची कमी – जीवनसत्व बी१२ ला सामान्यपणे ‘ऊर्जा जीवनसत्त्व’ म्हणतात. कधी कधी हात थरथरणे बी १२ जीवनसत्व कमी असल्याचे संकेत देते.

हार्मोन्समध्ये बिघाड – शरीरात काही हार्मोन्स वाढल्या कारणानेही स्ट्रेसचा स्तर वाढतो तसेच ब्लड सर्कुलेशन बिघडतं. त्यासोबतच व्यक्तीमध्ये चिडचिडपणा वाढतो, गोष्टी विसरु लागतो आणि हात थरथरु लागतात.

मात्र कायम हात थरथरणे हे याचा अर्थ कोणता तरी आजार असणे असाही नाही, काही लोकांचे हात आनुवंशिकतेमुळेही थरथरू शकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु