SCAD हा आजार होतो फक्त महिलांना, जाणुन घ्या याविषयी १० गोष्टी

SCAD हा आजार होतो फक्त महिलांना, जाणुन घ्या याविषयी १० गोष्टी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही दुर्मिळ आजारांपैकी SCAD म्हणजेच स्पोन्टेनियस कोरोनरी आर्टरी डिसेक्शन हा आजार आहे. हा हार्ट अटॅकचा प्रकार असून तो फक्त महिलांना येतो. हा आजार साधारणत: बाळांतपणानंतर होतो. वयाच्या चाळीशीनंतरही होण्याची शक्यता असते. बाळांतपण अथवा चाळीशीनंतर होत असलेल्या हार्मोनल बदलांमुळे काही वेळ आर्टरीच्या लेयर मध्येच तुटतात, ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.

हे आहेत संकेत

* शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित न झाल्याने मान आणि खांदे यामध्ये वेदना होणे.

* सतत काही दिवस छातीच्या वरच्या भागात वेदना होणे.

* शरीरात योग्यप्रकारे रक्ताचा पुरवठा न झाल्याने पिवळेपणा दिसणे.

* रक्तदाब नेहमी जास्त राहणे.

* थोडेसे काम केले तरी थकवा, श्वास घेण्यास त्रास, कमजोरी जाणवते.

* नेहमी अस्वस्थता जाणवतो आणि घाम येतो.

* सतत पोट खराब होणे आणि अ‍ॅसिडीटीची समस्या होणे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु