गुलाबाच्या पाकळ्या देतात १० आरोग्य फायदे, अवश्य जाणून घ्या

गुलाबाच्या पाकळ्या देतात १० आरोग्य फायदे, अवश्य जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  देशी गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद तयार केले जाते. हे विविध आजारावर खुप गुणकारी आहे. आयुर्वेदातही गुलकंद महत्वाचे मानले गेले आहे. तसेच गुलाबाची पाने, पाकळ्या यांचे इतरही अनेक उपाय आहेत. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अनेक न्यूट्रिएंट्स असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. गुलाबाच्या पानांच्या आरोग्याच्या फायद्यांविषयी जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

१) यातील फायबरमुळे डायजेशन चांगले होते. बध्दकोष्ठता किंवा पाइल्स टाळण्यात मदत होते.

२) यातील व्हिटॅमिन सी मुळे उर्जा मिळते. दिवसभर अ‍ॅक्टिव्हनेस टिकून राहतो.

३) यातील पॉलीफेनॉल्समुळे कँसरसारखे गंभीर आजार टाळण्यात मदत होते.

४) याच्या अँटीसेप्टिक गुणांमुळे जखम लवकर ठिक होते.

५) गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्याने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

६) यातील अँटी इन्फेमेटरी प्रॉपर्टीजमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

७) यातील अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीजमुळे दमा टाळण्यासाठी प्रभावी आहे.

८) मेटाबॉलिज्म वाढते. वजन कमी करण्यात मदत करते.

९) गुलाबाच्या पाकळ्यांनी बॉडीचे टॉक्सिन्स दूर होतात. पिंपल्स ठिक होतात.

१०) डाययूरेटिक गुणांमुळे यूरिन प्रॉब्लम दूर होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु