तांदळाच्या पाण्याने नाहीसा होईल केसातील कोंडा, ‘हे’ ७ उपाय

तांदळाच्या पाण्याने नाहीसा होईल केसातील कोंडा, ‘हे’ ७ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अयोग्य आहार तसेच प्रदूषणामुळे केसांच्या अनेक समस्या वाढत चालल्या आहेत. केस गळणे, वाढ खुंटणे, केस अकाली पांढरे होणे, शुष्क होणे, केसात कोंडा होणे, यामुळे केसांचे खुप नुकसान होते. आहारात पोषकतत्त्वांची कमतरता, केसांची योग्य निगा न राखणे, जास्त रसायन असलेल्या शाम्पूचा वापर, शाम्पूनंतर केस चांगल्या प्रकारे न धुणे, अशा कारणांमुळे केसात कोंडा होतो. ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय असून ते जाणून घेवूयात.

हे उपाय करा

ऑलिव्ह ऑइल 
खोबरेल तेल आणि ऑलिव्ह ऑइल सम प्रमाणात घेवून त्यामध्ये थोडासा लिंबूचा रस टाका. या मिश्रणाने १० मिनिटे केसांची मालिश करावी. यानंतर टॉवेल गरम पाण्यात टाकून गरम करुन घ्या. या टॉवेलने केसांना ३ मिनिट झाकुन ठेवा.

मेथीदाणे
मेथीदाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी भिजलेले मेथीदाणे बारीक करा आणि या पेस्टमध्ये थोडा लिंबाच्या पानांचा रस टाका. हे डोक्याला लावा आणि ४५ मिनिटांनंतर केस धुवून घ्या. आठवड्याून एकदा हा उपाय केल्यास कधीच कोंडा होणार नाही.

जास्वंदची फूले 
जास्वंदची फूले वाटून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांवर लावा. ही पेस्ट एक नॅचरल कंडीशनर आहे.

आवळ्याचा रस 
आवळ्याचा रस आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करुन केसांची मालिश करा.

तांदुळाचे पाणी
तांदुळ शिजवल्यानंतर उरलेल्या पाण्याचा उपयोग कोंडा कमी करण्यासाठी होऊ शकतो. या पाण्यात थोडी शिकाकाई पावडर टाकून केसांना लावा. काही वेळ ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवून घ्या.

कापूर
१-२ कप खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल कोमट करा. यामध्ये ४ ग्राम कापूर टाका. कापूर पूर्णपणे विरघळल्यावर या तेलाने मालिश करा. आठवड्यातून एकदा मालिश अवश्य करा.

एरंड, मोहरी 
खोबरेलतेल, एरंड आणि मोहरीचे तेल समप्रमाणात घेवून या तेलांने केसांची चांगली मालिश करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु