तुळस औषधी असली तरी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा होतील ‘हे’ ५ साईड इफेक्ट

तुळस औषधी असली तरी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा होतील ‘हे’ ५ साईड इफेक्ट

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  तुळस ही एक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात तुळशीला खुप महत्व आहे. अनेकजण तुळशीची पाने खाण्याचा सल्ला देतात. परंतु, तुळशीचे सुद्धा काही साईड इफेक्ट आहेत. कारण तुळस सर्वांसाठीच फायद्याची ठरू शकत नाही. तुळस कुणी खाऊ नये, त्याचे कोणते परिणाम होतात, ते जाणून घेवूयात.

हे लक्षात ठेवा
१ एस्टामिनोफेन सारखी औषधे घेणारांनी तुळशीची पाने नियमीत खाल्ल्यास त्यांच्या लिव्हरवर परिणाम होऊ शकतो. कारण दोन्हीचा उपयोग एकाच दुखण्यासाठी आहे. हे दोन्ही एकाचवेळी शरीरात गेल्यास त्याचा लिव्हरवर परिणाम होतो.

२ तुळशीच्या पानांमध्ये असलेल्या आयर्नमुळे दातांवर डाग पडू शकतात.

३ तुळशीची पाने गर्भवती महिलांसोबतच त्यांच्या पोटात वाढत असलेल्या बाळासाठीही नुकसानदायक ठरु शकतात. गर्भपाताचीही भीती असते.

४ तुळशीची पाने खाल्ल्याने ब्लड शुगरची लेव्हल कमी होते. अशात जर डायबिटीजचा रुग्णाने आधीच औषधे सुरू असताना तुळशीची पाने खाल्ल्यास शरीरातील शुगर लेव्हल प्रमाणापेक्षा जास्त कमी होऊ शकते. हे हानिकारक ठरु शकते.

५ जे रक्त पातळ करणारी औषधे घेतात, त्यांनी तुळस सेवन करू नये. कारण तुळशीची पाने सेवन केल्यानेही रक्तपातळ होते. औषध आणि तुळशीची पाने यांचा एकत्रित परिणाम झाल्याने त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु