लक्षात ठेवा ! हे पदार्थ कधीही एकत्र खाऊ नका, बिघडू शकते तब्येत

लक्षात ठेवा ! हे पदार्थ कधीही एकत्र खाऊ नका, बिघडू शकते तब्येत
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – विविध अन्नपदार्थांच्या केवळ चवीचा आनंद घेताना आपण त्यांच्या गुणधर्मांचा कधीही विचार करत नाही. खाण्याचेही काहीं नियम असतात. पदार्थांचा आस्वाद घेताना काही छोट्याछोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर त्याचे वाईट परिणाम तब्येतीवर होतात. योग्य आणि समतोल आहार घेणे गरजेचे असते. तसेच जेवणात पदार्थांचे योग्य कॉम्बिनेशन आवश्यक असते. कोणते पदार्थ एकत्र खावेत आणि कोणते खाऊ नयेत, यास खूप महत्व आहे. आयुर्वेदामध्ये याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यासंदर्भातच महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

कांदा आणि दुध
कांदा आणि दुध कधीही एकत्र सेवन करू नका. कांद्यासोबत दुध सेवन केल्यास विविध प्रकारचे त्वचा रोग, खाज, एग्जिमा, सोरायसिस होण्याची भिती असते.

दुधासोबत लिंबू
दुधासोबत लिंबू किंवा इतर आंबट पदार्थ खावू नयेत. यामुळे तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्यास अ‍ॅसिडिटी होते.

उडदाची डाळ आणि दही
उडदाच्या डाळीसोबत दही सेवन केल्यास हृदयाशी संबधित आजार होऊ शकतात.

दुधासोबत दही
दुधासोबत दही खाणे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते. दुध आणि दही दोघांचे गुणधर्म वेगळेआहेत. हे पदार्थ एकत्र खाल्ल्यास पोटाचे आजार होऊ शकतात.

चिकनसोबत मिठाई
चिकनसोबत मिठाई कधीही खाऊ नये. यामुळे पोट खराब होण्याची शक्यता असते.

कोल्ड्रिंक आणि पानमसाला
कोल्ड्रिंकनंतर किंवा अगोदर पेपरमेंटयुक्त पानमसाला किंवा इतर कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नये. कोल्ड्रिंक आणि पेपरमेंट एकत्र आल्यास सायनाइड तयार होते. हे विषासमान कार्य करते.

बटाटा आणि तांदूळ
बटाटा टाकलेला गरमभात अनेकजण आवडीने खातात. परंतु, हे त्रासदायक ठरू शकते. बटाटा आणि भात हे दोन्ही पदार्थ एकत्र खाऊ नयेत. यामुळे पित्ताचा त्रास होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु