मानेचे दुखणे पळवा ६० सेकंदांत, लगेच मिळेल आराम

मानेचे दुखणे पळवा ६० सेकंदांत, लगेच मिळेल आराम

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एकाच स्थितीत आठ-आठ तास बसून काम केल्यामुळे काहींना मान, पाठ, कंबरेचे दुखणे सुरू होते. यासाठी बैठे काम करणारांनी दर अर्धा तासाने उठून थोडे चालले पाहिजे. जेणेकरून शरीराला थोडा व्यायाम मिळेल आणि शिरा मोकळ्या होतील. परंतु, ही काळजी न घेतल्याने अनेजण मानदुखीच्या आजाराने त्रस्त असतात. दीर्घ काळापर्यंत खुर्चीवर बसून काम केल्यास मान आणि पाठीच्या वरच्या भागात वेदना होतात. स्नायूंमधील तणाव आणि वेदनेपासून आपण फक्त ६० सेकंदांतच मुक्ती मिळवू शकतो, असे काही तज्ज्ञ सांगतात.

दुखण्याची जागा ओळखा
मानेच्या उजव्या भागात दुखत असेल तर डावा हात वेदनेच्या जागी ठेवा आणि मानेच्या डावीकडे दुखत असल्यास उजवा हात वेदना होत असलेल्या बिंदूवर ठेवा.

बिंदूवर दाब द्या 
दुखत असलेल्या ठिकाणी बोटांनी हळूहळू दाबा. दाब दिल्याने जास्त वेदना होणार नाहीत, याची काळजी घ्या.

मानेची हालचाल
वेदना होत असलेल्या ठिकाणाच्या विरुद्ध दिशेने मान झुकवा. स्नायू सक्रिय करण्यासाठी दाब दिल्याने तुम्हाला आराम मिळेल.

ताण द्या
आपण आळस देतो त्याप्रमाणे मान आणि पाठीचा वरचा भाग ताणून धरा. यामुळे वेदना कमी होतील. यामुळे स्नायूंना आराम मिळेल.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु