कामाच्या ठिकाणी आलेला ‘ताण’ असा कमी करा, जाणून घ्या ‘तंत्र’

कामाच्या ठिकाणी आलेला ‘ताण’ असा कमी करा, जाणून घ्या ‘तंत्र’
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अतिरिक्त कामामुळे अनेक व्यक्तींना मानसिक आणि शाररिक ताणाचा सामना करावा लागतो. यामुळे कामात लक्ष न लागणे, अस्वथ वाटणे, वेळेत काम पूर्ण न केल्याने टेंन्शन येणे या समस्या उद्बवतात. अशाप्रकारचा त्रास होत असल्यास काही खास टीप्स फॉलो केल्यास मानसिक त्रासातून मुक्त होता येऊ शकते.

अ‍ॅप डाउनलोड करा

मोबाईलच्या अतिवापराने मानसिक ताण वाढतो. मात्र, याच मोबाईचा चांगला वापर केला तर मानसिक ताण हलका सुद्धा होऊ शकतो. ताण कमी करण्यासाठी अनेक अ‍ॅप उपलब्ध आहेत. ऑफिसमध्ये असताना ताण कमी करण्यासाठी या अ‍ॅप्सचा उपयोग होऊ शकतो.

ब्रेक घ्या

एकाच जागी काम केल्याने शरिराची हालचाल मंदावते. त्यामुळे अर्धा तासाच्या अंतराने जागेवरुन उठून बाहेर फिरुन यावे. यामुळे शरीर आणि मनावरील अतिरिक्त ताण कमी होतो.

कामाची यादी करा

काम करताना गोंधळ उडू नये म्हणून कामाची यादी तयार करा. ऑफिसमधून घरी जाण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी कोणती कामे करायची आहेत, याची नोंद ठेवा. यामुळे काम वेळेत पूर्ण होते. कामाचा अतिरिक्त ताणही पडत नाही.

व्हिटॅमिन सी चे सेवन

आहारात व्हिटॅमिन सी चे सेवन करावे. व्हिटॅमिन सी च्या सेवनामुळे ताण कमी होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु