‘या’ महिला जगतात जास्त, वाचा आरोग्याशी संबंधित काही रंजक गोष्टी

‘या’ महिला जगतात जास्त, वाचा आरोग्याशी संबंधित काही रंजक गोष्टी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – प्रत्यक्ष वयापेक्षा कमी वयाच्या दिसणाऱ्या महिलांचे आयुष्य सर्वसाधारण महिलांच्या तुलनेत जास्त असू शकते. एका संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ज्या महिला कमी वयाच्या दिसतात त्यांचा रक्तदाब कमी असतो. त्यामुळे त्वचेवर वयाचा विपरित परिणाम होत नाही. त्यांचे रक्ताभिसरण अधिक चांगले असल्याने आयुष्यमान वाढते. आरोग्याविषयी अशाच काही रंजक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

आणखी काही रंजक गोष्टी

* पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. यावेळी काजळ किंवा आयलायनरद्वारेही संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांच्या मेकअपसाठी चांगल्या दर्जाच्याचे साहित्य वापरावे. तसेच डोळ्यांना आधीपासून संसर्ग असल्यास काजळ लावू नये. काजळामुळे डोळ्यांची जळजळ होऊ शकते. त्यामुळे संसर्ग वाढू शकतो.

* स्लिपिंग सिकनेस नावाचा आजार माशांच्या चावण्यामुळे होतो. त्यामुळे मेंदूवर सुज येते. या रुग्णांना ताप, डोकेदुखी, नीट झोप न येणे, इत्यादी त्रास होतो. संसर्गापासून बचाव करण्यासाठी शरिरातील रोग प्रतिकार यंत्रणा एक खास प्रकारचे प्रोटीन निर्माण करते. ट्रीपनोसोमा नावाची परजीवी गॅम्बियन प्रजाती या प्रोटीनला नष्ट करते. बेल्जियमच्या संशोधकांनी जनुकीय बदलाद्वारे एक असे प्रोटीन तयार केले आहे, ज्यामुळेट्रिपनोसोमा परजीवीच्या अनेक प्रजातींना नष्ट करता येईल.

* भुकेचा संबंध पोटापेक्षा मेंदूसोबत जास्त असतो, असे संशोधनात आढळून आले आहे. जेवण केल्याच्या काही तासांनंतर लोकांना भूक आणि जेवणाचे प्रमाण लक्षात राहत नाही. जेवणाबाबत स्मरणशक्ती चांगली असेल तर त्यांना भुकेची जाणीव कमी होते आणि असे लोक कमी जेवतात.

* तणावापासून लगेच दिलासा हवा असल्यास एका शांत आणि उत्तम श्रोता असलेल्या व्यक्तीचा शोध घ्यावा. अशा व्यक्तीकडे मनातील गोष्टी शेअर कराव्यात. यामुळे तणाव लकवर कमी होतो. तसेच चांगला सल्लाही मिळतो. अडचणीच्यावेळी अशी व्यक्ती सापडणे अवघड असते. म्हणूनच सोशल नेटवर्क चांगले ठेवावे. किंवा एखादा जवळचा मित्र फोनवरुन उपलब्ध राहिला पाहिजे.

* हात स्वच्छ धुण्यामुळे चांगल्या आरोग्यासोबतच सकारत्मक उर्जाही मिळते. एका संशोधनानुसार, हात धुण्याच्या सवयीमुळे काम करण्यासाठी सकारात्मक उर्जा मिळू शकते. कोणत्याही कामानंतर हात धुतल्यास संबंधित व्यक्ती पुढच्या वेळेस तेच काम अधिक चांगल्या पद्धतीने करु शकते

* सर्दी झाली असल्यास मसालेदार रस्सा खावा. कार्डिफ विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार, तिखट मद्रास करी खाल्यास गळ्यातील त्रास कमी होतो. औषधांसोबत काही प्रमाणात मसालेदार भाजी आणि रस्सा खाल्यास सर्दीपासून लवकर दिलासा मिळू शकतो.

* ज्या मुलांच्या हात आणि पायाची बोटे सुजलेली किंवा प्रमाणापेक्षा जास्त उष्ण असतात, तर ते सिकल सेल आजाराचे प्राथमिक लक्षण असू शकते. सुरुवातीच्याच चाचणीत निदान झाल्यास कमी वयात मृत्यूची शक्यता कमी होते. सिकल सेल हा अनुवांशिक आजार आहे. आफ्रिकन आणि दक्षिण अमेरिकन लोकांमध्ये हा आजार जास्त दिसून येतो. या आजारात २५ टक्के मुलांचा मृत्यू ५ वर्षांच्या आतच होतो. असे मृत्यू रोखणसाठी योग्य उपचार आवश्यक आहेत.

* कानाच्या अकार्यक्षमतेमुळे हायपर अ‍ॅक्टीव्हीटीला शरिरातून प्रोत्साहन मिळते. म्हणजेच, स्वभावातील चिडचिड वाढते. स्वभावासंबंधी अडचणी केवळ मेंदुमुळे निर्माण होतात, असे आजवर मानले जात होते. परंतु, नव्या संशोधनानुसार, कानाचे काम योग्य प्रकारे होत नसल्यास न्युरॉलॉजिकल बदल होतात. त्यामुळे कानांचे योग्य उपचार केल्यास चिडचिड कमी होऊ शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु