लठ्ठपणा आणि मधुमेहावर गुणकारी कच्ची केळी, ‘हे’ आहेत फायदे

 
लठ्ठपणा आणि मधुमेहावर गुणकारी कच्ची केळी, ‘हे’ आहेत फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सर्वसामान्यपणे बहुतांश लोक पिकलेली केळीच खातात. पिकलेली केळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. परंतु, कच्ची केळी खाल्ल्याने यापेक्षा दुप्पट फायदे होतात. ही केळी वजन घटविण्यासाठी उपयुक्त आहेत. यासाठी रोज एक कच्चे केळे खावे. तसेच कच्च्या केळीचे सेवन केल्यास प्राथमिक स्तरावरील मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, विटॅमिन बी ६, विटॅमिन सी, चांगले स्टार्च तसेच अ‍ॅन्टिऑक्सिडेंट्स असतात.

हे आहेत फायदे

१) मलावरोध
यातील फायबर आणि हेल्दी स्टार्चमुळे आतडी स्वच्छ होतात. मल साचून राहत नाही. यामुळे मलावरोधची समस्या नष्ट होते.

२) भूक शमते
यातील फायबर्स आणि अन्य पोषक तत्त्वांमुळे भूक नियंत्रित होते. वेळोवेळी भूक लागत नाही.

३) कॅन्सर
कॅन्सरपासून बचाव होतो. यातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. मूड स्विंगची समस्या दूर होते.

४) पचनक्रिया
यामुळे पाचक रसांचे स्त्रावण उत्तम होऊन पचनक्रिया सुधारते.

५) लठ्ठपणा
रोज एक कच्चे केळे खाल्ल्यास यातील फायबर्समुळे अनावश्यक फॅट सेल्स आणि अशुद्धता नष्ट होते.

* मधुमेह
मधुमेहाचा प्राथमिक स्तर असल्यास कच्चया केळीचे सेवन करावे. मधुमेह नियंत्रणात राहतो.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु