‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय

‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम –  पावसाळ्यात डेंग्यू सारखा गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असतो. कारण या काळात डेंग्यूचे डास मोठ्याप्रमाणात वाढतात. या आजारात डोकेदुखी, मळमळ, उलटी, डोळ्यांत दुखणे आणि शरीरावर पुरळ अशी लक्षणे आढळतात. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास स्थिती हाताबाहेर जाऊन पोटदुखी, हिरड्या आणि नाकातून रक्तस्राव, लघवीद्वारे रक्त, श्वास घेण्यास अडचण आणि थकवा अशी लक्षणे दिसतात. अशा स्थितीत रुग्णाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. यासाठी वेळीच डॉक्टरांकडे गेले पाहिजे. यासोबतच पपईच्या पानांचा उपाय केल्यास चांगला लाभ होतो. हा उपाय कसा करावा, जाणून घेवूयात.

असा करा उपाय
१) पपईची पाने बारीक करून त्यातील रस काढून घ्या.
२) दिवसातून २ चमचे २ वेळा हा रस सेवन करा.
३) कडवपणा दूर करण्यासाठी मध किंवा फळांचा ज्युस टाकू शकता.

यासाठी आहे गुणकारी

* पपईच्या पानांमध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असते. यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढते.

* डेंग्यूच्या तापाने कमी झालेल्या रक्तपेशी पपईच्या पानांच्या उपायाने वाढतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु