रोज काही वेळ तर्जनीवर दाब दिल्यास होतील ‘हे’ खास फायदे

रोज काही वेळ तर्जनीवर दाब दिल्यास होतील ‘हे’ खास फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हस्तमुद्रेने विविध आजार दूर करता येणे शक्य असते. शास्त्रामध्ये हस्त मुद्रांचे महत्त्व नमूद करण्यात आले आहे. या शास्त्रात सांगण्यात आलेल्या एका खास मुद्रेविषयी आपण माहिती घेणार असून ही मुद्रा केल्याने कोणते फायदे होतात, हे जाणून घेवूयात. आयुर्वेदानुसार आपल्या हाताची पाच बोटे म्हणजेच अंगठा – अग्नी तत्व, तर्जनी- वायू तत्व, मधले बोट – आकाश तत्व, अनामिक – पृथ्वी तत्व, करंगळी – जल तत्व, हे या विशेष तत्वाचे प्रतिनिधित्व करतात.

६० सेकंद दाब द्या

हातावर शरीराच्या विशिष्ट भागासाठी काही विशेष प्रेशर पॉईंट असून या ठिकाणी दाब दिल्यास चमत्कारिक आरोग्य फायदे होतात. हस्त मुद्रांचा वापर करून अशाच प्रकारे उपचार केला जातो. तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगरवर दररोज कमीत कमी २-३ वेळा ६० सेकंद दाब द्यावा. अंगठा आणि इंडेक्स फिंगर एकत्र करून केवल मुद्रा करा.

हे होतील फायदे

१) बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि युरिनशी संबंधित आजारात लाभ होतो.
२) वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते.
३) पोटाशी संबंधित विविध आजार औषध न घेता ठीक होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु