अकाली रजोनिवृत्तीमुळे होऊ शकतात हृदयाचे आजार

अकाली रजोनिवृत्तीमुळे होऊ शकतात हृदयाचे आजार
पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी तसचं शस्त्रक्रिया या सर्वांमुळे महिलांना अकाली रजोनिवृत्तीचा धोका निर्माण होताना दिसतो. रजोनिवृत्ती ही वयाच्या ५० व्या वर्षात येऊ शकते. इन्स्टिट्युट ऑफ सोशल अ‍ॅन्ड इकोनॉमिक चेन्जने केलेल्या एका सर्वेक्षणानूसार, सध्या वयाच्या तिशीतच महिलांना रजोनिवृत्तीचा सामना करावा लागतोय. नुकतचं केलेल्या एका संशोधनानुसार, ज्या महिलांना वेळेच्या आधी रजोनिवृत्ती येते त्यांना मोठ्या प्रमाणात हृदयाचा आजार होण्याची शक्यता असते.

युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डतर्फे केलेल्या अभ्यासातून रजोनिवृत्ती आणि हृदयाचे आजार यांच्यामध्ये संबंध आढळून आलाय.

त्यासोबच ज्या महिलांना लवकर मासिक पाळी येते, गर्भधारणेदरम्यान समस्या असतात त्या महिलांना देखील हृदयासंबंधीचे आजार होण्याची शक्यता असते. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डतर्फे केलेल्या अभ्यासातून, रजोनिवृत्ती आणि हृदयाचे आजार यांच्यामध्ये संबंध आढळून आलाय. त्यासोबच ज्या महिलांना लवकर मासिक पाळी येते, गर्भधारणेदरम्यान समस्या असतात त्या महिलांना देखील हृदयासंबंधीचे आजार होण्याची शक्यता असते. संशोधकांच्या सांगण्यानुसार, महिलांना असणाऱ्या प्रजनन समस्यांबाबत डॉक्टरांनी अधिक जागृत राहून त्यांची नियमितपणे तपासणी केली पाहिजे.

या संशोधनाचे प्रमुख अभ्यासक डॉ. सॅने पिटर यांच्या सांगण्यानुसार, हृदयाच्या आजारांना प्रतिबंध म्हणून महिलांनी वेळच्यावेळी तपासणी करून घ्यावी. या अभ्यासात संशोधकांनी ६९ वयोगटातील महिला आणि पुरुषांचा समावेश केला. या अभ्यासात सहभागी झालेल्यांची जीवनशैली तसचं आरोग्य याबाबत माहिती घेतली. हे संशोधन जर्नल ऑफ हार्टमध्ये प्रसिद्ध करण्यात आलंय. या संशोधनानुसार, ज्या महिलांना ४७ वयाच्या अगोदर रजोनिवृत्ती आली होती त्यांना हृदयाचे आजार होण्याचा ३३ टक्क्यांनी वाढला होता तर स्ट्रोकचा धोका ४२ टक्क्यांनी वाढला होता.

वयाच्या १२ वर्षाअगोदर ज्या मुलींना मासिक पाळी सुरु झाली होती त्यांना हृदयाच्या आजारांची शक्यता १० टक्क्यांनी वाढते. डॉ. पिटर पुढे म्हणाले की, ‘यासंदर्भात आम्हाला अजून संशोधन करायचं आहे. त्यामुळे रजोनिवृत्तीमुळे हृदयाचा धोका असतो याचं कारण सांगू शकत नाही. मात्र निरोगी महिलांनाही रजोनिवृत्ती लवकर सुरु झाल्यास हृदयाचा धोका होऊ शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु