गरोदर महिलांनी अवश्य खावेत बदाम, बाळाच्या मेंदूची होते योग्यप्रकारे वाढ

गरोदर महिलांनी अवश्य खावेत बदाम, बाळाच्या मेंदूची होते योग्यप्रकारे वाढ

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  गरोदर महिलांनी बदाम खाणे खुप लाभदायक ठरते. त्यांना व त्यांच्या गर्भातील बाळासाठी बदाम फायदेशीर ठरतात. यातील पोषकतत्वांमुळे बाळाच्या मेंदुची वाढ योगयप्रकारे होते. बदाम रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने याचे साल सहज निघते आणि त्यामधील पोषकतत्वे योग्य प्रकारे मिळतात. गरोदर महिलांनी बदाम खाल्ल्याने कोणते फायदे होतात, याविषयी माहिती घेवूयात.

हे आहेत फायदे –

१) यातील व्हिटॅमिन ए मुळे बाळाचे केस आणि त्वचा निरोगी राहते. गरोदर महिलांचे सौंदर्य वाढते.
२) बदामामध्ये कॅल्शियम असल्याने बाळाची हाडे मजबूत होतात.
३) बदामामध्ये पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
४) यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. हे प्रेग्नेंट महिलांचा डलनेसपासून बचाव करते.
५) यातील फॉलिक अ‍ॅसिडमुळे अबॉर्शनची शक्यता कमी होते.
६) फोलेट आणि व्हिटॅमिन बी६ मुळे मुलांच्या मेंदुचा योग्य विकास होतो.
७) रोज बदाम खाल्ल्याने कमजोरी दूर होते. हे मॉर्निंग सिकनेसपासून बचाव करते.
८) यातील आयर्नमुळे एनीमियापासून बचाव होतो.
९) यातील प्रोटीनमुळे बाळाची हाडे मजबूत होतात. लेबर पेन कमी होतो.
१०) यातील फायबर्समुळे अपचनापासून बचाव होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु