अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय

अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शेवंतीची फुले पुजाविधी आणि सजावटीसाठी वापरली जातात. परंतु, या फुलांंची पाने आणि मुळांचा वापर अनेक आजार बरे करण्यासाठी होतो. अनेकांना हे ठाऊक नसते. शेवंतीचे फुले आणि पाने यांचा उपयोग कोणत्या आजारात, आणि कसा केला जातो याची माहिती आपण घेणार आहोत.

हे आहेत फायदे

१) शरीरावर एखाद्या ठिकाणी गाठ असेल तर या झाडाची मुळी उगाळून लावल्यास गाठ जाते.
२) याची फुले वाळवून पाण्यातून पावडर प्यायल्याने किडनी स्टोन दूर होतो.
३) याची पाने आणि काळीमिरीचा काढा करून घेतल्यास युरिनच्या तक्रारी दूर होतात.
४) शेवंतीच्या फुलांचा चहा बनवून प्यायल्यास हातापायांची जळजळ दूर होते.
५) शेवंतीची पाने गरम पाण्यात टाका. या पानांचे पाणी प्यायल्याने हृदयविकारापासून बचाव होतो.
६) या फुलांचा काढा बनवून प्यायल्याने पीरियड्स प्रॉब्लेममध्ये आराम मिळतो.
७) या फुलांचा रस प्यायल्याने पोटदुखी कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु