डाळिंब आठवड्यातून एकदा तरी अवश्य खावे, आरोग्य आणि सौंदर्यासाठी उपयुक्त

डाळिंब आठवड्यातून एकदा तरी अवश्य खावे, आरोग्य आणि सौंदर्यासाठी उपयुक्त

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  डाळिंबाचा उल्लेख बायबल आणि ग्रीक मायथोलॉजीमध्ये करण्यात आला आहे. बायबलमध्ये यास पवित्र फळ मानून दीर्घायुष्याचे प्रतीक म्हटले आहे. आरोग्य आणि सौंदर्यवृद्धीसाठी डाळिंब हे फळ खुप उपयुक्त आहे. यातील अँटिऑक्सिडंट्समुळे पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स वाढतात. प्रजननक्षमताही वाढते. यासाठी आठवड्यातून एकदा कमीत कमी १०० ग्रॅम डाळिंबाचे दाणे खावेत. अथवा डाळिंबाचा ज्यूस प्यावा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

हे आहेत फायदे –

१) यातील व्हिटॅमिन-ए मुळे डोळ्यांची शक्ती वाढते.
२) यातील व्हिटॅमिन-ई मुळे सौंदर्य उजळते.
३) टेस्टेस्टेरॉन हार्मोन्स वाढल्याने पुरुषांमध्ये शुक्राणू आणि वीर्यवृद्धी होते.
४) यातील फॉलिक अ‍ॅसिड महिलांना गर्भधारणेसाठी आवश्यक आहे. तसेच गरोदरपणात विकासासाठी गरजेचे आहे.
५) डाळिंबाने कोलेस्टेरॉल पातळी कमी होते. हृदयाच्या तक्रारींपासून बचाव होतो.
६) यातील व्हिटॅमिन-सी मुळे कमजोरी दूर होते.
७) यातील फायबर्समुळे पचनशक्ती चांगली राहते. बद्धकोष्ठता दूर होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु