रक्ताची कमतरता दूर करते डाळिंब ; जाणून घ्या, इतर ९ फायदे

रक्ताची कमतरता दूर करते डाळिंब ; जाणून घ्या, इतर ९ फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – विविध औषधी गुणांनी डाळिंब हे फळ युक्त आहे. या झाडाच्या फळापेक्षा जास्त औषधी गुण सालीमध्ये, कळ्यांमध्ये आहेत. डाळिंबाचे वनस्पतिक नाव प्युनिका ग्रेनेटम आहे. डाळींबाचा वापर करून विविध आजारांवर उपचार करता येतात. डाळींबाचे औषधी उपाय आणि लाभ याची माहिती घेवूयात.

हे आहेत उपाय

* वाढत्‍या वयात शरीरातील वाढणारे ऑक्सिडाइजिंग नियंत्रीत ठेवण्‍याचे प्रमाण डाळिंब करते.

* डाळिंबाच्‍या ताज्या, कोवळ्या कळ्या बारीक कुटून पाण्यात टाकाव्यात, त्यांनतर पाणी गाळून हे पाणी प्यायल्यास गर्भधारण क्षमतेमध्ये वृद्धी होईल.

* तोंड आले असेल तर १० ग्रॅम डाळिंबाची पाने पाण्यात उकळून या पाण्याने गुळण्या केल्यास आराम मिळेल.

* डाळिंबाची फुले सावलीत वाळवून बारीक चूर्ण तयार करून घ्या. दिवसातून २-३ वेळेस या चुर्णाने दात घातल्यास दातांमधून येणारे रक्त थांबेल तसेच दात मजबूत होतील.

* डाळिंबामध्ये एंटी-ऑक्सीडेंट असल्याने शरीराला फ्री रेडिकल्स पासून रक्षण करते.

* डाळिंबाचे नियमित सेवन केल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.

* डाळिंबाच्‍या पानाचा चहा करून प्‍यायल्‍यानंतर पचनसंस्‍थेतील अडचणी दूर होतात. कॉलरा सारख्या आजारावर डाळिंबाचे ज्‍यूस लाभदायक आहे. शुगर असलेल्‍या व्‍यक्तिने डाळींबाचा रस प्‍यायल्‍यानंतर कॉरोनरी आजारापासून बचाव होतो.

* डाळिंबाचे ज्यूस ‍नियमित सेवन केल्याने सेक्स पॉवर दुपटीने वाढते. व्यक्तिची स्मरणशक्ती वाढते व त्याचा मूडही चांगला राहतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु