शारीरिक हालचाल आवश्यकच, अन्यथा शरीरात होतील ‘हे’ ८ बिघाड!

शारीरिक हालचाल आवश्यकच, अन्यथा शरीरात होतील ‘हे’ ८ बिघाड!

आरोग्यनामा ऑनलाईन टीम :  दिवसभर बैठे काम करणारांच्या शरीराची अजिबात हालचाल होत नाही. काम संपल्यानंतरही गाडीचा वापर करून घरी येणे, घरी आल्यानंतर एकाच ठिकाणी बसून टिव्ही बघत जेवण करणे आणि झोपी जाणे, सकाळी व्यायाम न करणे, असा दिनक्रम बहुतांश लोकांचा असतो. परंतु, हे आरोग्यासाठी अतिशय घातक असून यामुळे विविध प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

कमी हालचालीचे हे धोके
१ रक्ताभिसरणावर वाईट परिणाम होतो.
२ शरीर तंदुरुस्त राहत नाही.
३ शरीरातील पेशी अकार्यक्षम होतात.
४ शरीरात ऊर्जा निर्माण होत नाही.
५ चयापचय शक्ती कमी होते.
६ इन्फेक्शनचा धोका वाढतो.
७ तब्येत ढासळू शकते.
८ वजन वाढते.

हे लक्षात ठेवा
* शरीराची किमान हालचाल रोज झालीच पाहिजे.
* बाहेरचे वातावरण कसेही असले तरी नेहमीच्या अ‍ॅक्टिव्हिटीज सुरूच ठेवा.
* रनिंग, वॉकिंग, स्विमिंग करा.
* काही व्यायाम, शारीरिक हालचाली रोज करा.
* किमान सहा ते आठ तास झोप घ्या.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु