पेरुच्या पानांचे ‘हे’ उपाय करा, केसांच्या सर्व समस्यांपासून होईल तात्काळ सुटका

पेरुच्या पानांचे ‘हे’ उपाय करा, केसांच्या सर्व समस्यांपासून होईल तात्काळ सुटका

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पेरुचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. पेरुच्या पानांमध्येही अनेक औषधी गुणधर्म असतात. त्वचा, केस आणि आरोग्यासाठी पेरूची पाने खूप लाभदायक आहेत. पेरूच्या पानांचा उपयोग केसांच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो. या उपायांची माहिती आपण घेणार आहोत.

पेरुचे आणि लिंबू
पेरुचे पान आणि लिंबूचा रस एकत्र करून केसांना लावल्याने कोंडा दूर होतो. मुठभर पेरुची पाने बारीक करुन पावडर तयार करा. यामध्ये २-३ लिंबूचा रस मिसळून डोक्यावर लावा आणि २० मिनिटांसाठी तसेच राहू द्या. या उपायाने कोंडा दूर होतो.

पेरुचे पान आणि एवाकाडो
मुठभर पेरुच्या पानात २ कप पाणी मिसळा आणि पॅनमध्ये टाका. हे १५ मिनिट उकळून थंड करा. यामध्ये एवाकाडो मॅश करुन टाका. ही पेस्ट केसांना लावा. २५ ते ३० मिनिटे लावून ठेवूप नंतर गार पाण्याने डोके धुवा.

पेरुचे पान आणि अंड्याचा पांढरा भाग
अंड्याचा पांढरा भाग आणि २-३ चमचे पेरुच्या पानांची पावडर मिक्स करा. हे डोक्यावर लावा आणि ४० मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर केस शाम्पूने धुवा. हा उपाय आठवडाभर करा.

पेरुचे पान आणि कढीपत्ता
पेरुचे पान कढीपत्त्यासोबत मिक्स करुन पांढरे केस घालवता येतात. ४-५ पेरुचे पाने आणि मुठभर कढीपत्ता पाण्यात उकळून या पाण्याने डोके धुवा. केसांना फायदा होतो.

खोबरेल तेल आणि पेरुची पान
पेरुचे पान आणि खोबरेल तेलाने फ्रिजी हेयरची समस्या होते. २ चमचे पेरुच्या पानांची पावडर घ्या. यामध्ये ३ चमचे तेल मिक्स करा. ही पेस्ट ३० मिनिटे डोक्यावर लावा आणि नंतर शाम्पूने केस धुवा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु