पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पेरुमध्ये ‘क’ आणि  ‘अ’ जीवनसत्व व लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम ही द्रव्ये असतात. पेरू हे ताजे असताना खूप रुचकर व स्वादिष्ट फळ आहे. पेरूपासून जॅम, जेली, पेस्ट, नेक्टर व इतर पेये तयार करतात. तसेच पेरू हा अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. पेरू खाल्यामुळे अनेक आजार मुळापासून नष्ट होतात. त्यामुळे खालील आजार जर मुळापासून नष्ट करायचे असतील तर पेरू खा.

१) लठ्ठपणा :

लठ्ठपणा वाढण्याचे मुख्य कारण कोलेस्‍ट्रॉल असते. पेरूमधील उपस्थित तत्व कोलेस्‍ट्रॉल कमी करतात. यामुळे वजन वाढत नाही. त्यामुळे पुढील डायट शेड्युलमध्ये पेरूला नक्की स्थान द्या.

२) बद्धकोष्ठता  :

पेरू शरीरातील मेटाबॉलिझम समतोल ठेवल्यात मदत करते. यामुळे पेरूचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

३) फर्टिलिटी :

पेरूमध्ये फॉलेटचे प्रमाण जास्त असते. यामुळे महिलांमधील फर्टिलिटी वाढते. जर एखाद्या महिलेला आई होण्यात अडचण निर्माण होत असेल तर दररोज पेरूचे सेवन करावे.

४) थायरॉइड :

चयापचय सुरळीत ठेवण्यात थायरॉइड ग्रंथीची महत्त्वाची भूमिका असते. पेरूमध्ये आयोडीनचे प्रमाण जास्त असते. यामुळे थायरॉइडच्या समस्येत आराम मिळतो. शरीराचे हार्मोनल संतुलन कायम राहते.

५) डोळ्यांचे आजार :

पेरूमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ चे प्रमाण जास्त असते, जे डोळे निरोगी ठेवण्यात सक्षम ठरते. या व्यतिरिक्त पेरूमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर प्रमाणात असते, जे आजारांना दूर ठेवण्यास मदत करते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु