तिरळेपणावर ‘या’ वयातच करा शस्त्रक्रिया अन्यथा … 

तिरळेपणावर ‘या’ वयातच करा शस्त्रक्रिया अन्यथा … 

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – डोळ्यांचा तिरळेपणा हा लहान वयातील आजार आहे. तिरळेपणा जन्मत: असल्यानं किंवा मूल मोठं झाल्यानंतर तो दूर होईल या गैरसमजातून अनेक पालक मुलांच्या तिरळेपणाकडे दुर्लक्ष करतात. तिरळेपणामुळे हिणवणे, चिडवणे, न्यूनगंड, व्यंगातील कमतरता यांना कायम तोंड द्यावे लागते. तिरळेपणामुळे संरक्षण किंवा पोलीस यांसारख्या पोस्टवर नोकरी मिळत नाही.  तिरळेपणा हा दृष्टिदोष आहे आणि तो उपचारानंतर बरा करता येऊ शकतो.

तिरळेपणावर उपचार –

तिरळेपणावर जितक्या कमी वयात उपचार होतील तेवढं योग्य आहे.

चष्मा लागल्याने मुलाचा तिरळेपणा कमी होतो किंवा जातो.

चष्म्याने तिरळेपणा आटोक्यात येत नसेल तर तिरळेपणासाठी शस्त्रक्रिया करावी लागते.  दोन्ही डोळ्यांत  तिरळेपणा असेल तर आळीपाळीने शस्त्रक्रिया करून घ्यावी.

तिरळेपणाची शस्त्रक्रिया लहानपणातच करावी.  कारण दृष्टीची वाढ केवळ दोन वर्षापर्यंतच शक्य असते. जर मूल मोठे असेल आणि एका डोळ्यात जास्त वेळ तिरळेपणा असेल, तर तो डोळा निष्क्रिय होण्याची शक्यता जास्त असते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु