छोट्या-छोट्या दुखण्यांवर ‘पेनकिलर’ घेतल्यास पुरूषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

छोट्या-छोट्या दुखण्यांवर ‘पेनकिलर’ घेतल्यास पुरूषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सतत पेनकिलर घेणारे पुरूष आणि कमी प्रजनन क्षमता यामध्ये संशोधकांनी आश्चर्यकारक संबंध आढळून आला आहे. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सने केलेल्या संशाधनात हे समोर आले आहे. यामुळे अपत्य हवे असलेल्या आणि सतत पेनकिलर घेत असलेल्या पुरूषांसाठी ही धक्कादायक बाब असू शकते.

मानसिक तणावाचा परिणाम
संशोधकांनी अनेक पुरूषांच्या तपासण्या करून हार्मोन पातळीची तुलना केली. यात असे आढळून आले की, पुरुषांच्या ल्यूटिनायजिंग हार्मोनच्या उत्पादन स्तरासह पिटूयटरी ग्लँडच्या कामातही वाढ दिसून आली. हे दोन्ही प्रजननात महत्वाची भूमिका बजावतात. हे दोन्ही घटक शरीराच्या काही पेशींना टेस्टोस्टेरॉनचे अधिक उत्पादन करू देत नाहीत. यामुळे मानसिक तणाव तुलनेने जास्त वाढतो आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.

शुक्राणूंवर होतो परिणाम
जास्त पेनकिलर घेण्याची सवय असलेल्या लोकांमध्ये हायपोगोनॅडिज्म नामक स्थिती होण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे पुरूषांची प्रजनन क्षमता प्रभावित होते. शुक्राणूंची निर्मिती कमी होते. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पेनकिलरसारखी औषधे घ्यावीत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु