पॅकेटबंद दूधही असू शकते भेसळयुक्त, ५ मिनिटांत असे ओळखा

पॅकेटबंद दूधही असू शकते भेसळयुक्त, ५ मिनिटांत असे ओळखा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दूध आरोग्यासाठी लाभदायक असले तरी यामध्ये भेसळ असल्यास आरोग्याचे नुकसान देखील होऊ शकते. यासाठी नेहमी शुद्ध दूध पिणे आवश्यक आहे. काही भेसळखोर दूधामध्ये डिटर्जंट, यूरियासारखे घातक पदार्थ मिसळतात. यामुळे पॅकेटमधील दूधसुद्धा भेसळयुक्त असू शकते. अलिकडे असे अनेक प्रकार उघड झाले आहेत. दूध भेसळयुक्त आहे का, याची तपासणी घरच्या घरी करता येते. याची पद्धत जाणून घेवूयात.

अशी ओळखा भेसळ

१) दुधाचे काही थेंब वाटीमध्ये टाकून त्यामध्ये हळद टाका. जर हळद घट्ट होत नसेल दुधात भेसळ आहे.

२) दुध नेहमीपेक्षा जास्त उकळवा. यावर साय पिवळ्या रंगाची आली तर यामध्ये युरिया आणि इतर केमिक्लस आहेत.

३) दुध तापवल्यानंतर थंड होऊ द्या. एक कपभर दुधात लिंबू पिळा. दुध नासले तर ते शुद्ध आहे. नासले नाही तर भेसळयुक्त आहे.

४) अर्धा कप दुधामध्ये वेगाने पाणी मिसळा. यामध्ये फेस दिसला तर दुधामध्ये डिर्जेंटची भेसळ आहे.

५) थोडे दूध तळहातावर घासा गुळगुळीत लागले तर त्यामध्ये भेसळ आहे.

६) दुध गरम केल्यानंतर पिवळे दिसत असेल तर यामध्ये युरियाची भेसळ आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु