तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शेवग्याच्या शेंगाची भाजी आपल्याकडे जास्त प्रमाणात खाल्ली जाते. शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले यांचाही वापर स्वयंपाकात केला जातो. तसेच शेवग्याच्या बियांपासून तेल काढले जाते. शेवग्याची पाने, फुले, शेंगा, बिया, साल आणि मूळ यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असल्याने आयुर्वेदात त्यास खूप महत्व आहे. आयुर्वेदामध्ये ३०० रोगांवर शेवग्याने उपचार केले जाऊ शकतात, असे म्हटले आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये

* शेवग्यामध्ये दुधापेक्षा चार पट अधिक कॅल्शिअम आणि दोन पट अधिक प्रथिने असतात.

* यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्पलॅक्स भरपूर प्रमाणात आढळून येते.

* लोणच्यात, सॅलेडमध्ये, सूप करण्यासाठी शेवग्याचा वापर होतो.

* शेवग्याचे शास्त्रीय नाव मॉरिंगा ओलेफेरा आहे.

* भारतातील वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यंत वाढतो.

हे लक्षात ठेवा

पचन क्रियेशी संबंधित आजार शेवग्याच्या सेवनाने नष्ट होतात. अतिसार, कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांचा ताज रस, एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र प्यावे. शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सर आणि हृदय रुग्णांसाठी उपयुक्त औषध आहे. ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. पोटातील अल्सरवर गुणकारी आहे. शरीरातील उर्जेचा स्तर वाढतो. बियांचे चूर्ण वापरून पाणी निर्जंतुक करता येते. एक ते तीन वर्षांच्या लहान मुलांना आणि गर्भवती महिलांसाठी शेवगा वरदान आहे.

शेवग्याची मुळे जंतनाशक असतात. शेवग्याचे ज्यूस गर्भवती महिलेला दिल्यास प्रसूती दरम्यान त्रास होत नाही. प्रसूतीनंतर आईला वेदना कमी प्रमाणात होतात. शेवग्यातील व्हिटॅमिन ए सौंदर्यवर्धक आहे. डोळ्यांसाठी हे लाभदायक आहे. पिंपल्सची समस्या असेल तर शेवग्याचे सेवन करावे. शेवग्याचे सूप पिल्यास शरीरातील रक्त शुद्ध होते. शेवग्याच्या पानांपासून तयार केलेले सूप नियमित केल्यास अस्थमात आराम मिळतो. हृदयरोग, मधुमेह, मूतखडा, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांवर शेवगा गुणकारी आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु