बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण आपले आरोग्य चांगले रहावे म्हणून नेहमी काळजी घेत असतो. त्यामुळे घराच्या बाहेर गेल्यावर काहीजण बाहेरील उघड्यावरचे खाद्य पदार्थ टाळतात. आणि कुठेतरी फ्रेश ज्यूस असं लिहलेलं असत. त्या ठिकाणी आपली नजर जाते. व आपण ते ज्यूस घेतो. ज्यूस घेत असताना आपण कुठलाच विचार करत नाही. पण हे ज्यूस पिल्याने तुमच्या आरोग्यास खूप मोठी हानी पोहचते. त्यामुळे बाहेरील ज्यूस का घेऊ नये. ते जाणून घ्या.

१) बाहेर आपण जे ज्यूस पितो. ते बनवण्यासाठी अगोदरच फळे कापून ठेवलेली असतात. त्यामुळे त्यातील चव नष्ट झालेली असते. आपल्या पर्यंत ताजे ज्यूस येण्यासाठी भरपूर प्रमाणात साखर व संरक्षकाचा वापर केला जातो. हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

२) जास्त वेळ फळे कापून ठेवल्यामुळे त्यातील फायबर किंवा तंतूमय पदार्थांचे प्रमाण कमी होते. तसेच बहुतेक वेळा रसातील चोथा गाळून त्यात साखर घालून त्यांचे सेवन केले जाते. हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते.

३) एक ग्लास ज्यूस बनविण्यासाठी एकापेक्षा जास्त फळे वापरली जातात. त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज घेतल्या जातात.

४) काही कमी दर्जाचे फळांचे ज्युस तर निव्वळ साखर पाणी व फ्लेवर्स एकत्र करून बनवले जातात.

५) बाहेरील फळांचे ज्यूस घेतल्यामुळे पोटाभोवती अतिरिक्त चरबी वाढणे, ट्रायग्लिसराईड व कॉलेस्टेरॉल वाढणे, वजन वाढणे, इन्सुलिन रेझिस्टन्स या चयापचयाशी संबंधित व्याधी होऊ शकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु