ठाण्यातील ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान

ठाण्यातील ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान

पोलीसनामा ऑनलाइन टीम : एका ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान करण्याचा निर्णय त्यांच्या मुलांनी घेतल्याने अनेक रूग्णांना दिलासा मिळाला आहे. आई गेल्याचे दुख हे जगातील सर्वात मोठे दुख मानले जाते. परंतु, अशा दुखाच्या प्रसंगीही मुलांनी सामाजिक भान दाखवत आईचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांची आई त्यांना सोडून गेली असली तरी अवयवरूपी तिचे अस्तित्व असणार आहे. त्यांच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे गरजूंना जीवनदान मिळाले आहे.

ठाण्यातील च्या ६६ वर्षीय महिलेला ब्रेन स्टड्ढोक झाल्याने त्या बेशुद्ध झाल्या. त्याच अवस्थेत त्यांना ज्युपिटर रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यानंतर त्यांचे अवयव दान करण्यासाठी त्यांच्या कुटुंबानेच पुढाकार घेतला. आई ब्रेनडेड झाल्याचे कळताच दोन मुलांनी डॉक्टरांना अवयवदानाबाबत विचारणा केली.

डॉक्टरांनी अवयवदान करण्याबाबत परवानगी मागण्याआधीच या महिलेच्या मुलांनी आईचे अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली. या महिलेच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांची त्वचा आणि डोळे दान केले होते. त्यामुळे अवयवदानाबाबत कुटुंबिय जागरूक होत. महिलेचं यकृत, कॉर्निया आणि त्वचा दान करण्यात आली. यकृत ज्युपिटर रुग्णालयातील गरजूला देण्यात आले. त्वचा स्किन बँकेत तर डोळे नेत्रपेढीत पाठवण्यात आले. मधुमेह असल्याने हृदय आणि किडनी दान करता आले नाही, अशी माहिती ज्युपिटर रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण समन्वयक डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी दिली.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु