हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वी शरीर देते ‘हे’ 11 संकेत

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वी शरीर देते ‘हे’ 11 संकेत

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कामाची धावपळ, ताण-तणाव, याचा शरीरावर वाईट परिणाम होत असतो. त्यातच आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यास कुणालाही हृदयविकारचा झटका येऊ शकतो. परंतु, हार्ट अटॅक येण्याची लक्षणे साधारण एक महिना आधीपासून दिसण्यास सुरुवात होते, असे काही संशोधकांना आढळून आले आहे. हे संकेत वेळीच ओळखले तर प्राण वाचू शकतात.

श्वास घेण्यास त्रास
श्वास घेण्यास त्रास, थकवा जाणवल्यास शरीराला आरामाची गरज असते. परंतु हे लक्षण हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हार्ट अटॅकचे असू शकते.

Image result for श्वास घेण्यास त्रास

अती घाम येणे  

जास्त घाम येणे हादेखील अटॅक येण्याचा संकेत आहे. खूप जास्त प्रमाणात घाम येत असेल तसेच त्वचा चिकट असल्याचा अनुभव होत असेल तर लगेच डॉक्टराचा सल्ला घ्यावा.

Related image

मळमळ, उल्टी

हलके अपचन आणि मळमळ ही हार्ट अटॅकची लक्षणे आहेत. पोटात दुखणे, अपचन, उल्टी हे लक्षणे हार्ट अटॅकची असू शकतात.

Related image

छातीत दुखणे 

छातीत दुखणे, ताण, घाबरल्यासारखे वाटणे, अस्वस्थता, छातीत अखडल्यासारखे वाटल्यास लगेच डॉक्टरांकडून तपासून घ्यावे.

Image result for छातीत दुखणे 
शरीराच्या इतर भागांमध्ये दुखणे
शरीराचा एखादा अवयव दुखणे अथवा अखडू शकतो. यामध्ये कंबर, मान, जबड्यामध्ये त्रास होतो. कधी-कधी हा त्रास शरीराच्या इतर भागांमध्ये सुरू होऊन हृदयापर्यंत जाऊ शकतो.

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वी शरीर देते ‘हे’ 11 संकेत

चिंता
शरीरावर येणारा अतिरिक्त ताण आणि चिंता देखील हार्ट अटॅकला करण ठरु शकते. रात्री झोपण्यासाठी त्रास होणे, झोपल्यानंतर चिंता, संकट येण्याची भावना अचानक झोपेतून उठणे ही हृदयविकाराची लक्षणे आहेत.

Related image

मन घाबरणे

नियमितपणे मन घाबरणे हा देखील ह्रदयविकार येण्याचा संकेत असू शकतो. त्यामुळे हे थकव्याचे लक्षण असल्याचे समजून दूर्लक्ष करू नका.

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वी शरीर देते ‘हे’ 11 संकेत
दंड जड पडणे
दंड सारखे-सारखे जड पडत असतील तर हे हृदयरोगाचे एक लक्षण आहे. याकडे दूर्लक्ष केल्याने पॅरालेसिसचा अटॅक देखील येण्याची शक्यता असते.

एखादा भाग निकामी होणे
जर शरीराच्या एखाद्या भागाने काम करणे बंद केले तर याकडे दुर्लक्ष करु नका. साधारण शरीराचे खांदे, दंड अथवा मानेच्या मागील भाग काम करणे बंद होणे ही लक्षणे हृदय रोग असू शकतात.

अस्पष्ट उच्चार 
बोलताना त्रास होत असेल तर किंवा शब्दांचे उच्चार अस्पष्ट होत असतील तर हे हार्ट अटॅक येण्याची सूचना असू शकते.

हृदयाचे ठोके वाढणे
कधी-कधी हार्ट अटॅक येण्याआधी पल्स आणि ठोक्याच्या हालचालींमध्ये अचानक वाढ होते. असे लक्षण आढल्यास लगेच डॉक्टरांकडे जावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु