सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका   

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका   

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराला ऊर्जेची गरज असते म्हणून मनुष्य दिवसातून २-३ वेळा जेवत असतो, ज्याने शरीरात ऊर्जा कायम राहते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे सकाळचा नाष्टा. पण आपण आपल्या रोजच्या कामामुळे सकाळचा नाष्टा न करताच दिवसाची सुरुवात करतो. पण सकाळचा नाष्टा न करता राहणे शरीरासाठी घातक आहे. जरी याचे परिणाम आता जाणवत नसेल तरी हळू हळू याचा परिणाम होतो.

जर तुम्हाला वजन वाढत असेल या कारणाने तुम्ही डायट म्हणून जर असे करत असाल तर लवकरच सावध व्हा. कारण वजन वाढण्यामागे नाष्टा न करणे हे देखील एक कारण होऊ शकते. जर सकाळचा नाष्टा शरीराला नाही मिळाला तर शरीर आतून दुर्बल होऊ शकतो. तसेच तुम्ही सकाळचा नाष्टा नाही करत असाल तर तुम्हचा दिवशी आळस आणि थकव्या मध्ये निघून जातो. दिवसभराच्या कामासाठी शरीराला ऊर्जेची गरज असते अशात आपण सकाळचा नाष्टा करत नसल्याने आपल्याला ही ऊर्जा मिळत नाही.

जर तुम्ही सकाळचा नाष्टा करत नसेल तर यामुळे तुम्हाला टाईप-२ डायबेटिज होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे ब्लड शुगरही कमी होण्याची  शक्यता असते. तसेच तुम्हाला डिप्रेशन, टेन्शन आणि अस्वस्थता जाणवते.

जर तुम्ही सकाळचा नाष्टा नाही केला तर ब्लड शुगरचा लेव्हल खूप जास्त कमी होण्याची शक्यता असते. कारण साधारण  ८-१० तासांपासून काहीच तुमच्या पोटात नसतो.  सकाळी नाष्टा न केल्यामुळे डोके दुखी वाढण्याची शक्यता जास्त असते. यामुळे पुढे जाऊन मायग्रेन सारख्या आजाऱ्याला तोंड द्यावा लागतो. सकाळचा नाष्टा न केल्यामुळे पोटाचे आजारही उदभवू शकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु