नॉनस्टिक भांडी किडनी आणि फुप्फुसांसाठी नुकसानकारक

नॉनस्टिक भांडी किडनी आणि फुप्फुसांसाठी नुकसानकारक

आरोग्यनाम ऑनलाईन- आहारात जास्त तेलाचा वापर केल्यास शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. यामुळे अनेक शारीरीक त्रास सुरू होतात. स्वयंपाक करताना तेल कमी प्रमाणात वापरले जावे यासाठी अनेकजण नॉनस्टिक भांडी वापरतात. शिवाय तेल कमी असूनही पदार्थ भांड्याला चिकटत नाहीत. त्यामुळे यांना नॉनस्टिक भांड्यांना गृहिणी पसंती देतात. परंतु, कोलेस्टॉलपासून बचाव करणारी ही नॉनस्टिक भांडी किडनी आणि फुप्फुसांसाठी नुकसानकारक ठरू शकतात.

या भांड्यांच्या वापरामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारासोबतच लंग्स् डॅमेज होण्याचाही धोका असतो. नॉनस्टिक भांड्यांवर टेफ्लॉनचे कोटिंग असते. यास पॉलीटेटाफ्लूरोएथिलिन (पीटीएफई) म्हणतात. टेफ्लॉन पीएफओएने तयार केले जाते. हा एक विषारी पदार्थ असून यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. आता नॉनस्टिक भांड्यांमध्ये जेननेक्सचा वापर केला जातो आहे. यामुळे आता या नॉनस्टिक भांड्यांवर पीएफओए फ्रि असे लिहिलेले असते. परंतु, यानेही आरोग्याला नुकसान होऊ शकते. टेफ्लॉन सेफ कंपाउंड असून त्यामुळे आरोग्यासाठी थेटपणे हानिकारक नाही. परंतु, ३०० डिग्री सेल्सिअस तापमानास नॉनस्टिक भांड्यांवरील टेफ्लॉनचे कोटिंग वितळू लागते.

त्यामुळे हवेमध्ये प्रदूषित केमिकल मिश्रित होतात. हा विषारी धूर नाकात गेल्यासपॉली मर फ्यूम फिव्हल किंवा टेफ्लॉन फ्लू होऊ शकतो. यामुळे थंडी वाजणे, ताप येणे, डोकेदुखी आणि अंगदुखी असा त्रास होतो. टेफ्लॉन जास्त गरम झाल्याने लंग कॅन्सरही होऊ शकतो, असे काही तज्ज्ञ सांगतात. हे धोके टाळण्यासाठी नॉनस्टिक पॅनला प्री-हीट करू नये. पॅन गरम करण्याआधी त्यात पदार्थ किंवा पाणी टाकावे. ज्यामुळे टेफ्लॉन कोटिंग तुटून धोकादायक फ्यूम तयार होणार नाही.

अशा भांड्यांसाठी नेहमी लाकडाच्या चमच्याचा वापर करावा. धातुच्या चमच्यांचा वापर केल्याने टेफ्लॉन कोटिंग निघू शकते. नॉनस्टिक भांडी जुनी झाल्यास त्यांचे टेफ्लॉन कोटिंग निघते, अशी भांडी वापरू नयेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु