‘स्मार्टफोन’ च्या अतिवापराने होतो ‘नोमोफोबिया’, वेळीच सावरा, अशी घ्या काळजी

‘स्मार्टफोन’ च्या अतिवापराने होतो ‘नोमोफोबिया’, वेळीच सावरा, अशी घ्या काळजी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे व्यक्तीच्या स्वभावात काही विचित्र बदल होतात. तो मोबाइलशिवाय राहू शकत नाही. अशा व्यक्तीला फोन हरवण्याची, बॅटरी संपण्याची, नेटवर्क जाण्याची सतत भीती वाटत राहते. सतत मोबाइलमध्येच व्यस्त असल्याने कुटुंब आणि मित्रांपासून दूर आपल्याच विश्वात रममाण होणे, तहान-भूकेची शुद्ध नसणे, अशी लक्षणे दिसतात. यामुळे वैयक्तिक विकास खुंटतो. हा एक मानसिक आजार असून यास नोमोफोबिया असे म्हटले जाते.

नोमोफोबियाची माहिती
नोमोफोबियाचा पहिला रुग्ण २००८ मध्ये इंग्लंडमध्ये आढळला.
जगभरामध्ये ६६ टक्के लोकांमध्ये नोमोफोबियाची लक्षणे आढळून आली होती.
नोमोफोबियाचे प्रमाण सतत वाढत चालले आहे.
संशोधकांना पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याची लक्षणे सर्वात जास्त आढळली.

लक्षणे
१) चिडचिड होणे
२) एकलकोंडेपणा निर्माण होणे
३) डोळ्यांची जळजळ
४) लठ्ठपणाचे प्रमाण वाढणे
५) वेळेचे व्यवस्थापन कोलमडणे
६) मोबाइलशिवाय राहू न शकणे
७) फोन हरवण्याची, बॅटरी संपण्याची, नेटवर्क जाण्याची सतत भीती वाटणे
८) मोबाइलमध्येच सतत व्यस्त राहणे
९) कुटुंब आणि मित्रांपासून दूर जाणे
१०) विश्वात रममाण होणे, तहान-भूकेची शुद्ध नसणे

अशी घ्या काळजी
* मेसेज व इतर गोष्टींसाठी वेळ ठरवा. सतत फोनमध्ये गुंतून राहू नका.
* झोपताना फोन बंद ठेवा.
* अनावश्यक अ‍ॅप किंवा गेम्स घेणे टाळा.
* नोटिफिकेशन बंद ठेवा.
* कुटुंब, मित्र, शेजारी यांच्याशी चांगला संवाद ठेवा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु