चंदनाचा ‘टिळा’ आवश्य लावा, आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्‍त

चंदनाचा ‘टिळा’ आवश्य लावा, आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्‍त

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चंदनाला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात चंदनाचा टिळा लावूनच करतात. हा टिळा कपाळावर किंवा दोन्ही भुवयांच्या मधोमध लावण्याची प्रथा आहे. आपल्या कपळावर आज्ञाचक्राचे स्थान आहे. सूर्याच्या बोटाने टिळा लावल्याने मुखमंडल सूर्याप्रमाणे तेजस्वी बनू लागते. तसेच आज्ञाचक्रही जागृत व्हायला मदत होते. यामुळे मनाची एकाग्रता वाढायला मदत होते. टिळा लावणारा यशस्वी आणि ओजस्वी बनतो. तसेच चंदनाचा टिळा लावल्याने आपले आरोग्यही सुधारते. त्यामुळे जाणून घेऊया चंदनाचा टिळा लावण्याचे फायदे.

१) कपाळावर दोन भुवयांमध्ये अग्नी चक्राचे स्थान असते. या स्थानालाच ‘तिसरा डोळा’ म्हणतात. हे एक उर्जास्थान असल्याने अध्यात्मात या स्थानाला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याची प्रथा आरोग्यदायीदेखील ठरते.

२) चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास मन स्थिर होण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. थंड प्रवृत्त्तीचे चंदन शरीरात आणि कालांतराने मनाला शांतता मिळवण्यास मदत करते.

३) चायनिज अ‍ॅक्युप्रेशरनुसार दोन्ही भुवयांमधील जागा ही शरीरातील नसा एकत्र मिळण्याची जागा समजली जाते. त्यामुळे या ठिकाणी मसाज केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.

४) तिसर्‍या डोळ्याचे स्थान हे अंतर्मन आणि विचारांचे केंद्रस्थान आहे. नकारात्मक विचारातून शरीरात येणारी नकारात्मक भावना या चक्राच्या माध्यमातून आत येते. मात्र चंदनाच्या टिळ्यामुळे त्यांना रोखण्यात यश येते.

५) चंदनामध्ये मंद सुवासाप्रमाणेच शरीरात थंडावा निर्माण करण्याची क्षमतादेखील आहे. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. सोबतीलाच नसांनादेखील थंडावा मिळतो. भारतासारख्या उष्णकटीबंधीय क्षेत्रात कपाळावर चंदन लावणे तुमच्या सार्‍या शरीराला थंड करण्यास मदत करते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु