जास्त गोऱ्या लोकांना होऊ शकतात ‘या’ ५ आरोग्य समस्या, जाणून घ्या

जास्त गोऱ्या लोकांना होऊ शकतात ‘या’ ५ आरोग्य समस्या, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपलाकडे गोरे असणे, हे सौंदर्य समजले जाते. नाक, डोळे, तोंड, चेहऱ्याची ठेवण यापेक्षा गोरेपणाला खूप महत्व आहे. परंतु गोरे असण्याचे काही दुष्परिणामही आहेत, असे तज्ज्ञ सांगातात. जास्त गोरेपणा असलेल्यांमध्ये मेलानिनची कमतरता असते. यामुळे गोऱ्या लोकांना सावळ्या लोकांच्या तुलनेत त्वचेच्या समस्या होण्याचा धोका जास्त असतो.
मेलानिनचे कार्य
त्वचेचा रंग हा मेलानिन पिगमेंटमुळे ठरतो. त्वचेमध्ये मेलानिनचे प्रमाण जास्त असेल तर रंग सावळा होतो. मेलानिनची कमतरता असेल तर त्वचा गोरी होते. मेलानिनमुळेच त्वचा आणि केसांचा रंग ठरतो. शिवाय विविध समस्यांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी ते उपयोगी असते.

स्किन कलर टोन
जागतिक पातळीवर त्वचेचा गोरेपणास ५ निकषांवर क्रमांक देण्यात आले आहेत. सर्वात जास्त गोरी आणि व्हाइट स्किनची एक आणि दोन नंबरची टोनिंग असते. इंडिया आणि एशियाई देशांमध्ये स्किन कलरची टोनिंग ३ आणि ४ नंबरची मानली जाते. सर्वात जास्त डार्क स्किनला ५ नंबरची स्किन टोन मानले जाते. एक आणि दोन नंबरच्या स्किन टोन असलेल्यांना आजार होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. परंतु ३ नंबरची टोन असलेल्यांनी सतर्क राहणे, चांगले असते. भारतीय वातावरण आणि स्किन टोननु ३० एसपीएफची क्रीम सर्वात चांगली असते.

होऊ शकतात या समस्या

सनबर्न आणि टॅनिंग

त्वचेच्या कर्करोगाचा धोका
सुरकुत्या आणि एजिंग
इन्फेक्शनचा धोका
रोगप्रतिकार शक्तीवर प्रभाव

अशी घ्या काळजी

उन्हापासून स्वताचे रक्षण करा
सेंसिटीव्ह पार्ट झाकून घ्या
सनस्क्रीन लावा
त्वचेवर डाग अथवा फोड आल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवा
खुप पाणी प्या
हेल्दी डाएट घ्या

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु