मोबाईल गेम्समुळे उद्भवतात अनेक शारीरिक समस्या, वेळीच घाला आवर

मोबाईल गेम्समुळे उद्भवतात अनेक शारीरिक समस्या, वेळीच घाला आवर

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : मोबाईल अथवा कॉम्प्युटरवर खेळले जाणारे गेम, ऑनलाइन गेम्स हे मनोरंजन किंवा टाइमपास करण्यासाठी खेडळले जात असले तरी आरोग्यासाठी ते घातक ठरत आहेत. सतत मोबाईलवर गेम्स खेळल्याने आजूबाजूचे काहीच भान रहात नाही. अनेकजण या गेम्सचे अ‍ॅडिक्ट होतात. हे व्यसन एकदा लागले की, त्यातून अनेक धोके निर्माण होतात.

सतत मोबाईलवर खेळ खेळत राहिल्याने स्नायू ताणले जातात तसेच दुखण्याचा त्रास सुरू होतो. तासनतास मोबाईल घेऊन बसल्याने अथवा स्क्रीनच्या समोर बसल्याने पाठ, मान आणि पाठीच्या कण्यासंबंधित त्रास सुरू होतात. शिवाय शरीराचा आकारसुद्धा बदलण्याचा धोका असतो. उदाहरणार्थ कुबड येणे, मान पुढे येणे, अशा समस्या निर्माण होतात. तसेच स्क्रीनवर सारखे पाहत राहिल्याने डोळ्यांवर दबाव वाढतो. यामुळे नजर कमकुवत होते. डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, खाज होणे असा त्रास जाणवू लागतो.

गेम्समध्ये फ्लेशिंग लाइट, इफेक्ट आणि ग्राफिक्सचा वापर होत असल्याने खेळणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर एवढ्या वेगाने माहिती येत असते की, त्या व्यक्तीला ते कळतही नाही. अशाने त्या व्यक्तीचे लक्ष एका गोष्टीवर स्थिर होत नाही. त्यामुळे दृष्टीसंबंधित दोष निर्माण होण्याची शक्यता जास्त बळावते. गेम्स खेळण्याच्या सवयीमुळे व्यक्ती एकाच जागी बसून रहाते. यामुळे वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो. शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे कॅलरी बर्न करण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी शरीरात फॅट वाढल्याने वजन नियंत्रणात राहत नाही. वजन वाढल्याने हाय बीपी आणि मधुमेहसारखे आजार होण्याचा धोका वाढतो.

गेम्स खेळताना घ्या ही काळजी

* जास्त वेळ गेम खेळू नका. मध्येच काही वेळ थांबून हात, मान, पाठीला आराम मिळेल असा हलका व्यायाम करा.

* हे व्यसन सोडण्यासाठी मैदानावरील खेळ खेळण्यास सुरूवात करा.

* कॉम्प्युटर गेम किंवा ऑनलाइन गेम खेळण्यासाठी दिवसातून एकच वेळ ठरावा. हा वेळ खूप कमी राहिल याची काळजी घ्या

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु