मोबाईल वेडापायी मुलंही डिप्रेशनची शिकार

मोबाईल वेडापायी मुलंही डिप्रेशनची शिकार

आरोग्यनामा ऑनलाईन – मोबाईल वेडापायी फक्त कुटुंबामध्येच तणाव होत नाही तर लहान मुलंही डिप्रेशनची शिकार होत आहेत. मोबाईल आपलं तिसरं काम झाला आहे. मोठी माणसं ऑफिस आणि मित्रांसोबत बीझी असतात, नंतर ते मोबाईल म्हणजेच सोशल मीडियामध्ये बीझी दिसतात. ज्यामुळे घर आणि कुटुंब हे जबाबदारीच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर गेलं आहे.

भारतासोबतच इतर ११ विकसनशील देशांमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून हा खुलासा करण्यात आला आहे. सरासरी ६४ टक्के लोकं सोशल मीडियाशी निगडीत असणाऱ्या मेसेजिंग अ‍ॅपचा उपयोग करतात. तेच ५३ टक्के लोक इंटरनेट आणि अ‍ॅप नसलेल्या स्मार्टफोनचा उपयोग करतात. या सर्वेमध्ये भारत, कोलंबिया, वेनेजुएला, मॅक्सिको, दक्षिण आफ्रिका, केन्या, व्हिएतनाम, फिलिपिन्स, जॉर्डन, लेबनान आणि ट्यूनिशियाच्या लोकांना सहभागी करण्यात आलं होतं. संशोधनामध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी ६४ टक्के फेसबुक आणि ४७ टक्के व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात.

संशोधनानुसार, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापर करण्याचा त्यांच्या मुलांवर वाईट परिणाम होत आहे असे विचारल्यावर अनेकांची उत्तरं सारखीच असल्याचे दिसून आले. ७९ टक्के लोकांनी सांगितले की, मुलांना स्मार्टफोन देत असाल तर त्यांच्यावर वाईट परिणाम करणारी वस्तू तुम्हीच त्यांच्या हातात देत आहात. त्याचबरोबर मुलांवर याचा वाईट परिणाम दिसत आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु