‘ही’ चूक केल्यास येऊ शकते अकाली वृद्धत्व, आरोग्यही बिघडू शकते

‘ही’ चूक केल्यास येऊ शकते अकाली वृद्धत्व, आरोग्यही बिघडू शकते
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नकळतपणे आपण काही सवयींना बळी पडतो. या सवयींमुळे अकाली वृद्धत्वासरखी समस्या उद्भवू शकते. कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सवय सुद्धा अशीच आहे. यामुळे लठ्ठपणा वाढतो. यामध्ये जास्त प्रमाणात शुगर आणि केमिकल्स असतात. शरीराला आवश्यक असे कोणतेही तत्व यामध्ये नसते. या सवयीमुळे कंबरेवर, हिप्सवर चरबी जमा होते.
८ वर्ष मोठे दिसता
कोल्ड ड्रिंक्समधील फॉस्फोरिक अ‍ॅसिडमुळे अकाली वृद्धत्व येते. व्यक्ती वयापेक्षा ८ वर्ष जास्त मोठी दिसते.
कमजोर हाडे
कोल्ड ड्रिंक्समधील कार्बन डायऑक्साइड, फॉस्फोरिक अ‍ॅसिड आणि कॅफीनमुळे हाडे कमजोर होतात.
डायबिटीज
या सवयीमुळे डायबिटीज होण्याची शक्तया २६ टक्के वाढतात. तसेच मेटाबॉलिकसंबंधी आजार होऊ शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु