दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दुधी भोपळ्याची भाजी आणि हलवा, हे दोन पदार्थ सर्वश्रुत आहेत. दुधी भोपळ्याचा विविध पदार्थांमध्ये वापर केला जातो. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने आयुर्वैदामध्ये दुधी भोपळ्याचे महत्त्व सांगितले आहे. दुधी भोपळा आरोग्याच्या अनेक समस्यांचे निवारण करू शकतो. मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांना दुधी भोपळा म्हणजे वरदान आहे. दुधी भोपळ्याच्या अन्य औषधी गुणधर्मांबाबत आपण माहिती घेवूयात.

भोपळ्यात ९६ टक्के पाणी असते. दुधी भोपळ्यात लोह, क जीवनसत्त्व आणि बी-कॉम्प्लेक्स जास्त प्रमाणात असते. १०० ग्रॅम भोपळ्यात १.८ मि.ग्रा. सोडियम आणि ८७ मि.ग्रा. पोटॅशियम असते. तसेच यामध्ये कॅलरी आणि फॅटचे प्रमाण खूप कमी असते आणि डायटरी फायबर खूप जास्त असतात. त्यामुळे दुधी भोपळा नियमित सेवन करणे आरोग्याच्यादृष्टीने हिताचे आहे.

या आजारांवर आहे गुणकारी

* उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर आहे.

* पोटाशी संबंधित विविध आजार म्हणजेच अल्सर, अपचन या समस्या दूर होतात. उष्ण वातावरणात भोपळ्यामुळे आराम मिळतो.

* मूत्रपिंडविषयक आजार बरे होतात. लघवी करताना जळजळ होत असल्यास जेवणात भोपळ्याचा समावेश करावा. तसेच भोपळ्याचा रस नियमितपणे घ्यावा.

* थकवा जाणवणे, खूप तहान लागणे, असा त्रास होत असल्यास एक ग्लास भोपळ्याच्या रसात थोडेसे मीठ घालून सेवन करावे. असे केल्याने घामातून माध्यमातून सोडियम जाणार नाही. शरीरात सोडियमची पातळी कमी झाली की थकवा जाणवतो आणि खूप तहान लागते.

* अकाली केस पाढरे होण्याची समस्या असल्यास सकाळी सर्वात आधी भोपळ्याचा रस सेवन करावा. ही समस्या दूर होते.

* अनिद्रेची समस्या असल्यास भोपळ्याच्या रसात तिळाचे तेल मिसळून झोपण्यापूर्वी डोक्याची मालिश करावी.

* यकृताची कार्यप्रणाली चांगली ठेवण्यासाठी भोपळा खूप फायदेशीर आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु