पूरूषांसाठी त्रासदायक आहेत ‘या’ आरोग्‍य समस्‍या, जाणून घ्या कशा कराव्यात दूर

पूरूषांसाठी त्रासदायक आहेत ‘या’ आरोग्‍य समस्‍या, जाणून घ्या कशा कराव्यात दूर

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – खासकरून पुरूषांमध्ये आढळत असलेल्या काही समस्यांमुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण होतो. शिवाय, ते यापैकी काही समस्या कुणासमोर उघडही करू शकत नाहीत. परंतु, अशा समस्या सहज दूर होऊ शकतात. या समस्या कोणत्या आणि त्या दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत, याविषयी माहिती घेवूयात.

प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास
पूरूषांसाठी त्रासदायक आहेत ‘या’ आरोग्‍य समस्‍या, जाणून घ्या कशा कराव्यात दूर

वय वाढू लागले की एनलार्ज प्रोस्टेटची समस्या होते. यामुळे सतत बाथरूमला जावे लागते. अशा वेळी तत्काळ डॉक्टरांना भेटा. ते योग्य उपचार करतील.

टक्कल
Image result for टक्कल

केसगळती या समस्येनेही अनेक पुरूष त्रस्त असतात. शरीरामत आयर्न, कॅल्शियम, प्रोटीनसारखे न्यूट्रीयंट्सची कमतरता असणे तसेच तणाव यामुळे ही समस्या होते. यासाठी आहारात भाज्या, फ्रूट्स, डेअरी प्रॉडक्ट्स, स्प्राउट्स आणि डाळींचा समावेश करा. रोज व्यायाम करावा. यामुळे तणाव कमी होईल.

वाढलेले पोट
पूरूषांसाठी त्रासदायक आहेत ‘या’ आरोग्‍य समस्‍या, जाणून घ्या कशा कराव्यात दूर

अयोग्य आहार, शारीरिक हालचाल कमी करणे, या कारणामुळे पुरुषांच्या पोटाची चरबी जलद वाढते. नियमित चालण्याचा व्यायाम करा. गोड आणि तेलकट पदार्थ जास्त खाऊ नयेत.

श्वासाची दुर्गंधी
Image result for श्वासाची दुर्गंधी

तोंडाची स्वच्छता योग्य प्रकारे न केल्याने बॅक्टेरिया वाढून तोंडाची दुर्गंधी येते. रोज दोन वेळा ब्रश करा. काहीही खाल्ल्यानंतर गुळणी करा. जेवणानंतर बडीसोप किंवा विलायची खा.

घामाची दुर्गंधी
Image result for घामाची दुर्गंधी

शरीराची योग्य प्रकारे स्वच्छता न केल्याने अनेक पुरुषांच्या घामाची दुर्गंधी येते. पाण्यात थोडे मीठ किंवा तुरटी टाकून अंघोळ करा. यामुळे बॅक्टेरिया दूर होऊन दुर्गंधी येणार नाही.

घोरणे
पूरूषांसाठी त्रासदायक आहेत ‘या’ आरोग्‍य समस्‍या, जाणून घ्या कशा कराव्यात दूर

झोपेत योग्य प्रकारे श्वास घेता न आल्यामुळे पुरूषांना घोरण्याची समस्या होते. रात्री झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. घोरण्याची समस्या दूर होईल.

जास्त केस
Image result for जास्त केस
काही पुरुषांची पाठ आणि काही सेन्सिटिव्ह भागांवर खुप जास्त केस वाढतात. शरीरामध्ये एंडड्ढोजन हार्मोनचे बॅलन्स बिघडल्यावर ही समस्या होते. रेझर किंवा हेअर रिमूव्हिंग क्रीमने केस साफ करा. लेसर ट्रीटमेंटने कायमचे हे केस काढता येतात.

खाज
Related image

पुरूषांना अनेकदा थाइज किंवा प्रायव्हेट पाट्र्सवर कोरडेपणा वाढल्यामुळे किंवा फंगल इन्फेक्शन झाल्यामुळे खाज येते. अंघोळीनंतर पूर्ण शरीरावर तेल अथवा मॉइश्चरायजर लावा. यामुळे कोरडेपणा राहणार नाही. ओले किंवा जास्त टाइट कपडे घालू नका. अँटिफंगल क्रीम लावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु