पुरूषांना ‘या’ समस्या ठरू शकतात त्रासदायक, करा ‘हे’ रामबाण उपाय

पुरूषांना ‘या’ समस्या ठरू शकतात त्रासदायक, करा ‘हे’ रामबाण उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही विशिष्ट समस्यांनी अनेक पुरूष नेहमीच त्रस्त असतात. यामुळे त्यांना अनेकदा लाजिरवाणे सुद्धा वाटत असते. या समस्या किरकोळ दिसत असल्या तरी दुर्लक्ष केल्यास भविष्यात त्या वाढून गंभीर सुद्धा होऊ शकतात. या समस्या कोणत्या आणि त्यावर कोणते उपाय करावेत, याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

समस्या आणि उपाय

पोटाचा घेर
अयोग्य आहार आणि व्यायामाच्या अभावामुळे पुरूषांच्या पोटाचा घेर वाढतो. यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा पुरूषांनी नियमित ३० मिनिटे वेगाने चालले पाहिजे. गोड आणि तेलकट पदार्थ खाऊ नयेत.

घामाची दुर्गंधी
शरीराची साफसफाई योग्य प्रकारे न केल्याने अनेक पुरूषांना घामाच्या दुर्गंधीची समस्या जाणवते. यासाठी पाण्यात थोडे मीठ किंवा तुरटी टाकून आंघोळ करावी. यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात. तसचे दुर्गंधीपासून सुटका मिळते.

श्वासाची दुर्गंधी
तोंडाच्या स्वच्छतेअभावी बॅक्टेरिया वाढल्याने तोंडाची दुर्गंधी येते. यासाठी दिवसात दोन वेळा ब्रश केला पाहिजे. काही खाल्ल्यानंतर गुळणी करावी. मुखवास म्हणून बडीसोप, वेलची अथवा लवंगचा वापर करावा.

घोरणे
काही पुरुषांना झोपेत घोरण्याची सवय असते. ही सवय घालवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात.

टक्कल
तरुणपणातच टक्कल पडल्याने अनेक पुरूष त्रस्त असतात. लोह, कॅल्शियम, प्रोटिन्स अशा पोषकतत्वांची कमतरता, ताणतणाव आदी कारणामुळे केस गळतात. ही समस्या दूर करण्यासाठी आहारामध्ये भाजीपाला, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मोड आलेली कडधान्य, आणि डाळींचा समावेश करावा. रोज व्यायाम करावा.

अंगावर केस
काही पुरूषांच्या शरीरावर विशेषत: पाठ आणि छातीवर मोठ्या प्रमाणात केस वाढल्याने त्यांना त्रासदायक वाटते. शरीरातील एंड्रोजन हार्मोन्स बॅलन्स बिघडल्याने केसांची वाढ जास्त होते. यासाठी रेजर किंवा हेअर रिमुव्हिंग क्रीमचा वापर करावा.

इनलार्ज प्रोस्टेट
वाढत्या वयात इनलार्ज प्रोस्टेटची समस्या होऊ शकते. यामुळे सतत बाथरुमला जावे लागते. यासाठी डॉक्टरांना भेटून योग्य उपचार घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु