मानसिक, शारीरीक आरोग्यासाठी दररोज करा मेडिटेशन, ‘हे’ आहेत खास ४ फायदे

मानसिक, शारीरीक आरोग्यासाठी दररोज करा मेडिटेशन, ‘हे’ आहेत खास ४ फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी मेडीटेशन म्हणजेच ध्यानधारणा खुप उपयोगी ठरते. धावपळीच्या जीवनात आवश्यक असलेल्या मानसिक आणि शारीरीक आरोग्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. परंतु, ध्यानधारणेमुळे हे मानसिक स्थैर्य आणि आरोग्य प्राप्त होते. काही लोकांना सुरूवातीस ध्यानधारणा करताना त्रास होतो, मात्र, नंतर सवय होते.

हे होतात फायदे

१ एकाग्रतेच्या कमतरतेमुळे कोणतेही काम करण्यात अडचण येते. यासाठी नियमित मेडिटेशन केल्यास एकाग्रता वाढते.

२ ध्यानधारणेमुळे संयम वाढतो. ध्यानधारणा करणारा व्यक्ती लहान लहान गोष्टीवर संयम सोडत नाही.

३ ध्यान केल्याने आरोग्यात सुधारते. नियमित ध्यानधारणा केल्याने तणावाची पातळी कमी होते आणि अस्वस्थतेवर नियंत्रण राहते. परिणामी, मानसिकता आणि शारीरिक आरोग्य कायम राहते.

४ ध्यानधारणेमुळे आपण स्वत:ला जाणून घेतो. आपण जे काही करत आहोत ते योग्य आहे की नाही याचेदेखील आत्मचिंतन करता येते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु