लिंबू-पाणी आणि अद्रकच्या ड्रिंकने दूर होतील अनेक आजार, अवश्य करा

लिंबू-पाणी आणि अद्रकच्या ड्रिंकने दूर होतील अनेक आजार, अवश्य करा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – लिंबू-पाणी आणि अद्रक याचे महत्व आनेकांना माहित आहे. परंतु, हे दोन्ही एकत्र घेतल्यास त्याचे अनेक फायदे आहेत. या दोन्हींमधील विविध घटकांमुळे आरोग्य चांगले राहते. शिवाय, या ड्रिंकने लठ्ठपणा दूर होतो. याचे इतरही फायदे असून ते जाणून घेवूयात.

असे तयार करा

लिंबाचा रस पाण्यात मिसळून यात अद्रकचा रस टका. यात साखर आणि चवीनुसार मीठ टाका.

हे आहेत फायदे
१) शरीराची पीएच लेव्हल नियंत्रित राहिल्याने त्वचेची चमक वाढते.
२) कोलेस्टेरॉल कमी होते. उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते.
३) व्हिटॅमिन-सी मुळे कमजोरी दूर होऊन एनर्जी मिळते.
४) आयर्नमुळे रक्ताच्या कमतरतेपासून बचाव करते.
५) चयापचय क्रिया सुधारल्याने वजन कमी होते.
६) रक्तातील साखर नियंत्रित झाल्याने मधुमेहाचा धोका टळतो.
७) शरीरातील विषारी घटक दूर झाल्याने किडनीची सुरक्षा होते.
८) अँटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीजमुळे सांधेदुखी कमी होते.
९) रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने सर्दी-पडस्यापासून बचाव होतो.
१०) यातील फायबर्समुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु