मलावरोध ही समस्या अनेक गंभीर आजारांचे उगमस्थान

मलावरोध ही समस्या अनेक गंभीर आजारांचे उगमस्थान

आरोग्यानामा ऑनलाइन टीम : बदललेली जीवनशैली आणि त्यामुळे बिघडलेल्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे अनेक आजार होतात. चूकीच्या आहार पद्धतीमुळे मलावरोध किंवा बद्धकोष्ठता ही समस्या अनेकांना सतावत असते. ही समस्या खूपच सामान्य असली तरी ती अनेक आजारांना जन्म देणारी आहे. प्रत्येक आजाराचे कारण कोणत्या ना कोणत्या प्रकारे मलावरोधच असते,असे तज्ज्ञ सांगतात.

लोकांच्या खाण्या पिण्याच्या सवयी इतक्या बिघडलेल्या आहेत की,अनेक आजारांना आयतेच निमंत्रण मिळते. त्यातच बाहेरचे खाणे शरीराला सर्वाधिक हानिकारक ठरत आहे. जेवणाच्या वेळा, चूकीचा आहार यामुळे पोटाच्या विविध समस्या नेहमीच होत असतात.याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. आज अनेक लोक चूकीच्या आहारामुळे विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे दिसून येते.

जर योग्य वेळी योग्य आहार घेतला तर अनेक आजारांना आपण सहज दूर ठेवू शकतो. अशीच एक पोटाची समस्या म्हणजे मलावरोध होय. मलावरोधाची समस्या अनेकांना असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, सतत मलावरोधाची समस्या राहिली तर त्याचे भयंकर दिसून येतात. तसेच मलावरोधाने व्यक्तीची कार्यक्षमता घटते. रोज जेवल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दुधात उकळलेले मनुके चावून खा आणि त्यानंतर ते दूध प्राशन करा. काही दिवसांतच तुमची पोटाची समस्या दूर होईल. सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी १ / २ ग्लास पाणी प्यावे. हा उपाय केल्यानंतर मलावरोध दूर होऊ शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु