‘चॉकलेट वॅक्स’ शरीरासाठी ‘उत्‍तम’, ‘असं’ घरच्या घरी तयार करा !

 
‘चॉकलेट वॅक्स’ शरीरासाठी ‘उत्‍तम’, ‘असं’ घरच्या घरी तयार करा !

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळ्यात वॅक्स करणे थोडे कठीण होते. कारण वातावरणात ओलावा जास्त असल्याने वॅक्सिंग क्रिम शरीराला लावल्यानंतर त्यावर स्ट्रिप ठेवल्यास अनेकदा स्ट्रिप काढताना फक्त वॅक्स आणि स्ट्रिप निघते, केस निघत नाही. कारण शरीरावर काही प्रमाणत पाण्याचे अंश असल्याने ही समस्या उदभवते. मग यामुळे आपल्याला त्रास सहन करावा लागतो. आणि नेहमी पेक्षा जास्त वेळ या वातावरणात वॅक्सिंगला लागतो. अशा वातावरणात चॉकलेट वॅक्सिंग हे एक उत्तम उपाय आहे.

चॉकलेट वॅक्सिंग या काळात शरीरासाठी उत्तम मानले जाते. यामुळे त्वचा मुलायम आणि तजेलदार होते. वेगवेगळ्या घटकांपासून चॉकलेट वॅक्स तयार केले जाते. पावसाळ्यात चॉकलेट वॅक्स हा योग्य पर्याय ठरतो. ज्याने आपल्याला खूप त्रास होण्यापासून बचाव होऊ शकतो. चॉकलेट वॅक्स तयार करण्यासाठी कोको, सोयाबीन तेल, बदामाचे तेल, ग्लिसरीन, व्हिटॅमिन आणि ऑलिव्हऑइल अशा बेसिक गोष्टींचा समावेश असतो. जे त्वचेसाठी खूपच उपयुक्त असतात. तर चला जाणून घेऊ घरात कशा पद्धतीने चॉकलेट वॅक्स तयार करता येते.

‘चॉकलेट वॅक्स’ शरीरासाठी ‘उत्‍तम’, ‘असं’ घरच्या घरी तयार करा !

-तुम्ही बाहेर न जाताच घरच्या घरी हे चॉकलेट वॅक्स तयार करू शकता. यासाठी तुम्हला जास्त कष्ट करायची  गरज नसते. यासाठी तुम्हाला अर्धा कप साखर, अर्धा कप पाणी, अर्धा कप सायट्रिक ॲसिड किंवा लिंबाचा रस, कोकोपावडर, बदाम तेल आणि एक चमचा ग्लिसरीन यांची गरज भासते.
‘चॉकलेट वॅक्स’ शरीरासाठी ‘उत्‍तम’, ‘असं’ घरच्या घरी तयार करा !

– वॅक्स तयार  करण्यासाठी पाण्यामध्ये साखर टाकून ते पाणी गरम करायला ठेवा. आता साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यात लिंबाचा रस, कोकोपावडर, एक चमचा बदाम तेल टाकून मिश्रण नीट मिक्स करा. आता  हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅसवरुन उतरवा. त्यात एक चमचा ग्लिसरीन टाकून मिश्रण नीट मिक्स करा. तुम्हचा चॉकलेट वॅक्स तयार आहे.

‘चॉकलेट वॅक्स’ शरीरासाठी ‘उत्‍तम’, ‘असं’ घरच्या घरी तयार करा !

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु